25.7 C
New York
Wednesday, July 17, 2024

तेजापुर  येथील विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी…

तेजापुर  येथील विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी…

  1. प्रशांत जुमनाके वणी :-   तेजापूर येथील स्वर्गीय विठ्ठल पाटील मांडवकर विद्यालयात  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
    “जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा” या अभियानाअंतर्गत क्रांती मा चा जिवण कालखंड विशद करताना सावित्रीबाई च्या कोटी कोटी लेकी या देशातील सर्वोच्च स्थावर जाऊन पोहोचल्याचे त्यांचे श्रेय हे केवळ क्रांती मा जाईल…तुम्ही जर शिकल्याच नसत्या तर कोन आमच्या आसवांची कदर केलीच नसती तु बोट धरून आम्हाला भिडेवाड्याच्या शाळेत दाखल करताना आणि शिक्षण देताना तुम्हाला रोजचा होणारा त्रास नजरे समोर ठेवला तर या माय माऊलीने येथील स्पृश्य-अस्पृश्य नि बहुजन समाजातील स्त्री शिक्षणासाठी, अंगावर चिखलांचा धोंड्यांचा मारा सहन करून मुलं-मुलींना शिक्षण दिले. आणि पहीली स्त्री शिक्षीकाचा मान मिळविला . सतीप्रथा – केशवपन – विधवा पुर्णरविवाह घडवून आणले. एका विधवा बाईचा मुलगा फुले दाम्पत्यांनी दत्तक सुद्धा घेतला.स्त्रियांचा उद्धार करने हाच ध्यास त्यांनी अंगिकारला होता. आज त्यांच्या नावाने पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले विद्यापीठ म्हणून ओळखले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रेया मालेकार हिने केले तर प्रास्ताविक श्री. मारोती पिंपळकर यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेषराव बेलेकार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मदन मडावी, प्रकाश गारघाटे, नयन नंदूरकर, गजानन मालेकार व विजय मांडवकर उपस्थित होते. सावित्रीच्या लेकीच्या भूमिकेत कु. तन्हवी शिरपूरकार, दीक्षा झाडे व समीक्षा गिरसावळे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कु. आयशा वाघाडे, मानसी ठमके, दुर्गा डाखरे व ऐश्वर्या गिरसावळे या मुलींनी सावित्रीची थोरवी व तिचे शैक्षणिक योगदान या विषयावर आपले विचार प्रकट केले, तर मुलांमध्ये खटेश्वर लडके, सुधीर शिरपूरकार, यश डोहे, सचिन धगडी, खुशांत लडके, अर्जुन तिरणकार, आयुष मालेकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन अमन डोहे याने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. संतोष मालेकार, प्रवीण विधाते व संजय तामगाडगे यांनी परिश्रम घेतले.
Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News