बसपाचे क्रांतीज्योतींना अभिवादन
जयंत साठे नागपूर प्रतिनिधी -: भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक व पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या 192 व्या जयंती निमित्त नागपूर जिल्हा बसपा ने कही हम भूल ना जाये या राष्ट्रीय अभियान अंतर्गत प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, पृथ्वीराज शेंडे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम ह्यांच्या नेतृत्वात क्रांतीज्योतीच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
बसपा नेत्या रंजनाताई ढोरे ह्यांनी फुले दाम्पत्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे व पुण्यातील फुले दाम्पत्याद्वारे पहिली मुलींची शाळा सुरू केलेल्या भीडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा अशी मागणी केली.
यावेळी प्रामुख्याने जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, जितेंद्र घोडेस्वार, अभिलेश वाहाने, महेश सहारे, संजय जैस्वाल, राजू चांदेकर, अविनाश नारनवरे, योगेश लांजेवार, अजय डांगे, प्रवीण पाटील, जगदीश गजभिये, सनी मून, शंकर थुल, मनोज गजभिये, सचिन मानवटकर, सदानंद जामगडे, राजकुमार बोरकर, विलास सोमकुवर, बुद्धम राऊत, रोहित वालदे, विनोद नारनवरे, नितीन वंजारी, गौतम गेडाम,
सुरेखा डोंगरे, वर्षा वाघमारे, प्रा करुणा मेश्राम, वंदना कडबे, वैशाली घागरगुंडे कांबळे, आशा गायकवाड, माया उके, विलास मून, प्रकाश फुले, प्रताप तांबे, सुनील कोचे, भानुदास ढोरे, अड विजय वरखडे, अंकित थुल, सुंदर भलावी, संभाजी लोखंडे, अड अतुल पाटील, किरण कांबळे, राजेंद्र सुखदेवे, तिष्य लांजेवार, विकास नारायने, वासुदेव मेश्राम, चंद्रसेन पाटील, अरुण शेवडे, विजय फुले, सोमाजी शंभरकर, राजू वालदे, विनोद सहाकाटे, शामराव तिरपुडे, अनिल मेश्राम, जितेंद्र पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.