राज्यस्तरीय आव्हाण-2022 च्या शिबीरात लोकमान्य टीळक महाविद्यालयाची निवड
सुरेंद्र इखारे वणी – मा.राज्यपाल यांच्या निर्मितीतून यशस्वी झालेल्या बहीनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव येथे आव्हाण -2022 हे राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबीर नुकतेच संपन्न झाले. यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची १२५ विद्यार्थ्यांची चमू सहभागी झाली यात लोकमान्य टिळक महाविद्यालय ,वणी च्या रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी व राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार प्राप्त डॉ.निलीमा दवणे यांची चमू व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली होती. तर यवतमाळ संघात रा.से.यो.चे दोन विद्यार्थी कु. अनुष्का वामनराव नाक्षिने , आणि प्रतिक रामदास क्षीरसागर यांची राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिरासाठी निवड झाली असून अतिशय उत्तम प्रशिक्षण पूर्ण केले आहे. प्रशिक्षणात फ्लड वॉटर रेस्कु, स्नेक बाईट, रोप क्लाइंबिंग , फायर रेस्कू, EMS, CPR, अशा अनेक गोष्टी चे प्रशिक्षण NDRF कडून घेउन महाराष्ट्रातील 1100 राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आपत्ती व्यवस्थापना साठी सज्ज झालेले आहेत त्यात लोकमान्य टिळक महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कार्यक्रम अधिकारी म्हणुन निवड होणे हि महाविद्यालय साठी अभिमानाची बाब आहे तसेच महाराष्ट्रातून महीला प्रतिनिधी म्हणून डॉ.निलीमा दवणे यांच्या उत्तम कामगिरी बद्द्ल राज्यातून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून रासेयो.समन्वयक डॉ.राजेश बुरंगे यांच्यासह चमूचा सत्कार मान. राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आला.उत्कृष्ठ कामगिरी बद्दल डॉ.निलीमा दवणे व विद्यार्थ्यांचे शि.प्र.मं चे अध्यक्ष मा. श्री.नरेन्द्र जी नगरवाला , उपाध्यक्ष श्री. रमेश जी बोहरा, सचिव श्री. ॲड. लक्ष्मणराव भेदी, सहसचिव श्री. अशोकराव सोनटक्के व संचालक मंडळ ,मा.प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे ,प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.