विमाशी संघाचे उमेदवार श्री सुधाकरराव अडबाले नामांकन अर्ज दाखल करणार
महाराष्ट्र राज्य विधानपरिषद नागपूर विभाग
सुरेंद्र इखारे वणी – विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत “उमेदवार सुधाकर गोविंदराव अडबाले” सोमवार दि. 9 जानेवारी 2023 दुपारी 1.00 वा., नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी (नामांकन) अर्ज दाखल करणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार “श्री व्ही.यू. डायगव्हाणे” व विमाशिसंघाचे सर्व पदाधिकारी/सदस्य/कार्यकर्ते तसेच पाठिंबा देणाऱ्या सर्व संघटनांचे प्रमुख/पदाधिकारी/सदस्य/कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आपण सर्वांनी “जवाहर विद्यार्थी वसतिगृह, लॉ कॉलेज चौक, सिव्हील लाइन, नागपूर येथे दुपारी 1.00 वा.” उपस्थित राहावे, असे आवाहन विमाशि संघाचे प्रांतीय अध्यक्ष एस जी बरडे यांनी केले आहे .
तसेच महाराष्ट्र विधान परिषदेकरीता नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाकरीता “विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा उमेदवार” आणि विविध संघटनांचा पाठिंबा मिळालेले श्री सुधाकरराव अडबाले सर यांना “Nagpur University Young Teachers Association” या संघटनेचे “अध्यक्ष मा. श्री बबनराव तायवाडे” यांनी सुध्दा आपल्या संघटनेचा पाठिंबा जाहीर केला आहे.तेव्हा 9 जानेवारीला दुपारी 1. 00 वाजता नागपूर येथे उपस्थित राहावे असे आवाहन श्रावण बरडे यांनी केले आहे.