25.7 C
New York
Wednesday, July 17, 2024

वणी येथे शिक्षण प्रसारक मंडळ करंडक क्रिकेट स्पर्धा

वणी येथे शिक्षण प्रसारक मंडळ करंडक क्रिकेट स्पर्धा

सुरेंद्र इखारे वणी  –  मन,मेंदू आणि मनगट यांचा समतोल विकास म्हणजे शिक्षण या स्वामी विवेकानंदांच्या व्याख्येला सार्थ करण्यासाठी मनगट अर्थात शारीरिक विकासाच्या दृष्टीने आपल्या विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती अर्थात युवक दिनाच्या निमित्ताने १२ जानेवारी रोजी शिक्षण प्रसारक मंडळ करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेच्या ३२ एकर जागेचा उपयोग विद्यार्थ्यांच्या विविधांगी विकासासाठी व्हावा या दृष्टीने तेथे तयार करण्यात आलेल्या नवीन क्रीडांगणावर नवीन खेळपट्टीचे आणि या स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रमेश बोहरा यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के संचालक उमाकांत कुचनकर, प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांच्यासह संस्थेतील विविध कर्मचारी उपस्थित होते.
आजचा उद्घाटनाचा सामना लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयाच्या उच्च माध्यमिक व्यवसाय प्रशिक्षण वर्ग तथा स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल यांच्या संघात घेण्यात आला. ज्यामध्ये स्वर्णलीला संघाने विजय संपादन केला.
तालुकास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत दहा संघ सहभागी होत असून स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा. उमेश व्यास प्रा. कमलाकर बावणे तथा प्रा. आनंद हूड विशेष परिश्रम घेत आहेत.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News