-1.4 C
New York
Friday, March 1, 2024

विद्यार्थ्यांना विज्ञानवादी बनवा  –  गट विकास अधिकारी किशोर गज्जलवार

विद्यार्थ्यांना विज्ञानवादी बनवा  –  गट विकास अधिकारी किशोर गज्जलवार

सुरेंद्र इखारे वणी:-निसर्गामध्ये ज्या बाबी मूलतः आहेत. पण आपल्याला माहीत नाही. त्याचा उलगडा करणे म्हणजे वैज्ञानिक शोध होय. शिक्षकांनी विज्ञानाला दैनंदिन जीवनाशी जोडलं तर ते समजायला सोपं जात. छोट्या, छोट्या गोष्टीत विज्ञान शोधण्याची सवय विद्यार्थ्यांना लावून विद्यार्थ्यांना विज्ञानवादी बनवा असे प्रतिपादन येथील गट विकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी केले. ते दि. 12 जानेवारीला मार्कंडेय पोद्दार लर्न स्कूल मंदर येथे आयोजित 50 व्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून बोलत आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या शाळेचे संचालक रमेश सुंकुरवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून गट शिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर, विस्तार अधिकारी प्रकाश नगराळे, चंद्रभान शेळके, विद्यालयाचे संचालक राहुल सुंकुरवार, प्राचार्या लता रफेल व सर्व केंद्र प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविकातून या विज्ञान प्रदर्शनाची भूमिका स्नेहदीप काटकर यांनी मांडली.
त्यानंतर अतिथीनी प्रसंगानुरूप उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त गुणांना वाव देऊन भविष्यातील ध्येय गाठावे असे आवाहन अध्यक्षीय भाषण करतांना रमेश सुंकुरवार यांनी केले. या विज्ञान प्रदर्शनीत वणी तालुक्यातील 78 शाळा सहभागी झाल्या आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक शाळेतील शिक्षिका विशाखा बलकी व शुभांगी देशमुख यांनी केले. आभार प्रदर्शन यशोधरा पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी पोद्दार लर्न स्कूलचे शिक्षक वृंद, गटसंसाधन केंद्राचे विनोद नासरे, अलका काळे, निशा चौधरी यांनी परिश्रम घेतले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News