विवेकानंद विद्यालयात स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंती
सुरेंद्र इखारे वणी- : येथील विवेकानंद विद्यालयात स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंती तसेच क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण समारंभ साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिलीप आसकर सर होते तर प्रमुख पाहुणे श्रीरामकृष्ण विवेकानंद मंडळाचे सन्माननीय सचिव श्री अविनाश भाऊ ठावरी हे होते.तसेच संचालिका व विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सन्मा.सौ. वंदनाताई वऱ्हाटे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्री नगराळे सर , गेडाम सर व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वामी विवकानंद व जिजाऊ जयंती निमित्त शहरतून विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थ्याची भाषणे घेण्यात आली. क्रीडा महोत्सवाच्या दरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी मनोगतातून स्वामी विवेकानंद व जिजाऊ यांचे आदर्श
मूल्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रेम राठोड सर तर आभार प्रदर्शन श्री. पुरुषोत्तम पिटलावार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले .कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.