कायर येथील विद्यानिकेतन स्कूल चे वतीने युवा चेतना रॅली।
सुरेंद्र इखारे वणी – कायर येथील विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल चे वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून गावाच्या मुख्य रस्त्यावरून राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी युवा चेतना रॅलीचे आयोजन केले . विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या युवा चेतना रॅलीला महाकालपूर येथील सरपंच सौ नीलिमा बोंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात झाली या युवा चेतना रॅलीत स्वामी विवेकानंद राष्ट्रमाता जिजाबाई ,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सरला ठावरी व शिक्षक वृंदाने परिश्रम घेतले