वणी येथील सिद्धार्थ वसतिगृहात पालक मेळावा संपन्न...
प्रशांत जुमनाके वणी : तालुक्यातील सिद्धार्थ वसतिगृह येथे दिनाक १३/०१/२०२२ रोजी शुक्रवार ला पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या पालक मेळाव्यात अध्यक्ष प्रा.पाटील सरांनी विचार व्यक्त करताना सांगितले की सिद्धार्थ वसतिगृह हे संस्कार केंद्र असून या वसतिगृहात चांगल्या पदावर गेलेल्या विद्यार्थ्याची माहिती पालकांना दिली. ह्या कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन वसतिगृहाचे अधिक्षक मंगल तेलंग यांनी केले. तरी या पालक मेळाव्यात अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.पुरुषोत्तम पाटील, उपाध्यक्ष एस.सोनारखन, सचिव नवनाथ नगराडे, सहसचिव बाळासाहेब राजूरकर, कोषाध्यक्ष जगदीश भगत, संचालक भाऊराव मजगवडी, डी.एन.कांबळे, तर पालक प्रतिनिधी म्हणून प्रवीण शेळके तथा पालक वर्ग हे उपस्थित होते.