देवराव पाटेकर यांचे लगत शेत शिवारात पट्टेदार वाघ मृतावस्थेत। प्रशांत जुमनाके वणी – तालुक्यातील ग्रामीण भागातील परिसरात खेड्यापाड्यात कामाच्या दिवसात वाघ आला वाघ दिसला अशी गावकऱ्यात गेल्या महिन्याभरापासून चर्चा होती परंतु आज वणी तालुक्या लागत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी गावाच्या पलीकडील रेल्वे लाईन जवळील कोंडा मार्गावर असलेल्या देवराव पाटेकर यांचे शेत शिवारात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला आहेत. त्यामुळे वाघ पाहण्याकरिता बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. या मृत वाघाची माहिती वनविभागाला मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परंतु मृतावस्थेत असलेल्या वाघाला पाहून गावकऱ्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे काही बघ्ये म्हणतात वाघाने काहीतरी खाल्ले त्यामुळे त्याचे पोट फुगले त्यामुळे मृत पावला असेल तर काही म्हणतात इलेक्ट्रिक शॉक लागून मरण पावला असल्याची चर्चा गावकऱ्यात होती . परंतु नेमका वाघाचा मृत्यूव कश्याने झाला हे वनविभागाच्या पंचनाम्यानंतर बाहेर येईल सध्यातरी वाघाचा मृत्यूव गुलदस्त्यात आहे.अशी सर्वत्रच चर्चा आहे.