Wednesday, September 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedवणी येथील योगवर्गात सामुहिक सूर्यनमस्कार व तीळसंक्रांत कार्यक्रम संपन्न

वणी येथील योगवर्गात सामुहिक सूर्यनमस्कार व तीळसंक्रांत कार्यक्रम संपन्न

वणी येथील योगवर्गात सामुहिक सूर्यनमस्कार व तीळसंक्रांत कार्यक्रम संपन्न
.
सुरेंद्र इखारे वणी – आयुष्य मंत्रालय, भारत सरकार व भारतातील सर्व योगसंस्थांचे वतीने 15 जानेवारीला अधिकाधिक सूर्यनमस्कार घालुन जागतीक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्याकरिता. भारत स्वाभीमान ट्रस्ट व महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे वतीने धानोजे कुणबी समाज सांस्क्रुतीक भवन चिखलगांव व बाजोरीया सभाग्रुह वणी येथील नियमित योगवर्गात सामुहिक सूर्यनमस्कार चे आयोजन करण्यात आले होते.       यावेळी प्राचीन योगग्रंथात दिलेल्या पद्धतीनुसार पुरक व रेचक सह , त्यात दिलेल्या सात आसनासह व सूर्यनमस्कार मंत्रासह बारा सूर्यनमस्कार घालुन सूर्यनमस्काराचे महत्व स्पष्ट करण्यात आले.
नुकत्याच संपन्न झालेल्या चिखलगांव ग्रामपंचायत निवडणुकीत बहुसंख्य मताने विजयी झालेल्या योगशिक्षीका सौ.मायाताई माटे यांचा महिला योग साधकांनी पुष्प व तीळगुळ खाऊ घालुन सत्कार केला व यावेळी सौ.मायाताईनीही नागरिकांना येणा-या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.त्यानंतर *तीळ गुळ खा व गोड गोड बोला* असा संदेश देउन तीळगुळ वाटप करून तीळसंक्रांत साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे संचलन व सादरीकरण लक्ष्मण इद्दे यांनी केले तर यावेळी श्री.रामराव गोहोकार,श्री.रमेश बोबडे,श्री. सुधाकर गारघाटे,श्री.गुलाब निते, श्री.वसंतराव उपरे,श्री. जयप्रकाश राजुरकर,सौ. मायाताई माटे, सौ. अल्काताई त्रंबके ,सौ. रेखाताई बोबडे ई . ईतर योगसाधक हजर होते तर बाजोरीया सभाग्रुह वणी येथे योगवर्गात संपन्न झालेल्या सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमात प्रा.महादेव खाडे,श्री.सुभाष पाचभाई,श्री. विजय ढाले,श्री. सुरेश बागळते व इतर योगसाधक हजर होते.
.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments