25.7 C
New York
Wednesday, July 17, 2024

मंदर येथे  राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे थाटात उदघाटन

मंदर येथे  राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे थाटात उदघाटन

सुरेंद्र इखारे वणी – येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उदघाटन मंदर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल सेमी इंग्रजी शाळेच्या व्यासपीठावर  दि. 15/1/2023 ला पार पडले या उदघाटन समारंभाला शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रमेशजी बोहरा , सहसचिव अशोक सोनटक्के,संचालक  अनीलजी जयस्वाल,  उमापतीजी कुचनकर , प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे उपस्थित होते. तसेच मंदर नवनिर्वाचित ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. वर्षाताई बोढे, उपसरपंच सौ. वंदनाताई उपरे ,  लक्षण मुनेश्वर  सचिव ग्रा. प. ,सदस्य अनंतराव बोढे, .निलेश उपरे,   कीशोर बोढे,सौ हेमलता पोटे,उपस्थित होते त्याचबरोबर तंटामुक्ती अध्यक्ष . दिनकर भट,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष . विनोद बुच्चे, उपाध्यक्ष जेबाताई शेख,सदस्य जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पी. बी. बोधकर उपस्थित होते .
यावेळी मनोगत व्यक्त करताना  रामेशजी बोहरा उपाध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ वणी यांनी ग्रामविकासाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना पटवून दिले . व्यक्ती विकासाचा मार्ग म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना असे प्रतिपादन संचालक  उमापती कुचनकर यांनी केले .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी या शिबिरातून विद्यार्थ्यांचा सर्वसमावेशक विकास साध्य होतो , सात दिवसाच्या निवासी शिबिरामुळे शिस्तप्रियता विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत होते असे प्रतिपादन केले . जि. प. शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. बी. बोधकर, श्री. अनील बुचे शा. व्य. स. अध्यक्ष आणि ग्रां. प. सचिव यांनी या श्रमसंस्कार शिबिर ला शुभेच्छा देऊन स्वयंसेवकांना सुंदर मार्गदर्शन केले . राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. निलिमा दवणे यांनी प्रास्ताविकामध्ये या विशेष शिबीराचे नियोजन आणि उद्देश सांगितले . सात दिवसाच्या उपक्रमाचा आराखडा स्पष्ट केला. कार्यक्रमाचे संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास जुनगरी यांनी केले. शिबिरामध्ये एकूण 100 विद्यार्थी सह या उद्घाटनाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News