नृसिंह व्यायाम शाळेत शेखर वांढरे यांचा वाढदिवस।
कार्तिक पटेल वणी – शहरातील पोलीस विभागात कर्तव्यावर असलेले अष्टपैलू ,सदाबहार ,मनमिळाऊ व शांत स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असणारे सहायक उपनिरीक्षक शेखर वांढरे यांचा वाढदिवस नृसिंह व्यायाम शाळेच्या नृसिंह रंगमंचावर केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोद इंगोले, दादाभाऊ राऊत, दिलीप येमुलवार, पांडुरंग पारावारजी, बंडू निंदेकर, सचिव पुरुषोत्तम आक्केवार, कार्तिक पटेल, डोंगरे व व्यायाम शाळेचे व्यायामपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षांनी भरभरून दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.