Friday, October 4, 2024
Google search engine
HomeUncategorizedवणीत पिकविमा कंपनीच्या अन्यायी धोरणा विरोधात "जबाब दो धरणे आंदोलन" 

वणीत पिकविमा कंपनीच्या अन्यायी धोरणा विरोधात “जबाब दो धरणे आंदोलन” 

वणीत पिकविमा कंपनीच्या अन्यायी धोरणा विरोधात “जबाब दो धरणे आंदोलन” 

* योग्य निर्णय न मिळाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा *

  एसडीओना दिले शेतकऱ्यांनी निवेदन  *    

सुरेंद्र इखारे वणी-   सततच्या पावसामुळे ,अतिवृष्टी व महापुरामुळे शेतपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 100 टक्के पीकविमा देण्याच्या मागणीचे निवेदन विजय पिदूरकर यांचे नेतृत्वात शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे याना दिले .          वणी तालुक्यात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असतानाही  विमा कंपनीने शेतकऱ्यांना अद्यापर्यंत नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे 100 टक्के नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी 16 जानेवारी रोजी वणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर “ पीकविमा कंपनीच्या अन्यायिधोरणा विरोधात जवाब दो धरणे आंदोलन”  करण्यात आले.    दिवसभर चाललेल्या या आंदोलनात विमा कंपनी व प्रशासनाला जागं करण्यासाठी शेतकऱ्यानी भजन सादर केलं त्यानंतर सायंकाळी निवेदन दिले .यावेळी स्थानिक आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी धरणे आंदोलन मंडपात  भेट दिली यावेळी मा.जि.प.सदस्य विजय पिदुरकर,शेतकरी नेते अनिल घाटे, शेतकरी संघटनेचे देवराव धांडे, दिनकर पावडे, विजय गारघाटे, अशोक सुर अध्यक्ष ख.वि., नारायण गोडे, कैलास पिपराडे यांच्या सह शेतकरी बांधवांसह महिलांची उपस्थिती होती.पंतप्रधान पिकविमा योजना खरिप हंगाम 2022-23 अंतर्गत वणी विभागात माहे जुलै, ऑगष्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर 2022 मध्ये सतत पाऊस, महापुर व 65 मी.ली. वर पर्जन्यमान झाल्याची व अतिवृष्टीची नोंद महसुल विभागाने केली असल्यामुळे शासनाने वणी विभागात 90 टक्के  नुकसान भरपाई मान्य करुन शासनानी शेतकऱ्यांना  मदत केली आहे. असे असतांनाही विमा कंम्पनीने फक्त 12 ते 14 टक्के पिकविमा शेतकऱ्यांच्या नावावर जमा केला. तसेच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजुनपर्यंत  एकही कवडी जमा केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवुन करुन आर्थीक लुट केली आहे. वणी तालुक्यात वाहीतीखाली पेरणी क्षेत्र 64030 पैकी बाधित क्षेत्र 53966झाले यामध्ये शासनाने नुकसानभरपाई दिली. हेक्टर 13280 पिकविमा धारक 14025 तक्रार कर्ते 13544 शेतकरी कापुस विमा हिस्सा 4620 आणि भरपाई मिळाली 5700 फक्त 10 टक्के  हे भरपाई कशी काढली हे समजत नाही.या संदर्भात प्रशासणास वेळोवेळी निवेदनाद्वारे सत्य परीस्थितीची जाणीव करुन दिली. परंतु संबधीत अधिकारी व विमा कंम्पनी याकडे दुलर्क्ष करीत असुन या कृतीमुळे शेतकऱ्यामध्ये तिव्र असंतोष आहे. त्यामुळे 100 टक्के मदत मिळेपर्यंत आंदोलन तिव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे निवेदनात म्हटले आहे.परंतु येत्या 10 दिवसात योग्य निर्णय घेऊन पिकविमाधारक शेतकऱ्यांना 100 टक्के पीकविमा मिळवून न दिल्यास जिल्हास्तरावर मोठे आंदोलन उभे करू व पुढे उदभवणार्या परिस्थितीस आपण जबाबदार राहाल असा इशारा निवेदनातून देण्यात आला संबंधित निवेदनाच्या प्रति आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, तहसीलदार निखिल धुळधर, पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर,याना देण्यात आले यावेळी विजय पिदूरकर, प्रशांत भंडारी, धनराज राजगडकर व समस्त  240 विमाधारक शेतकरी उपस्थित होते.

 

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments