शिरपूरच्या श्री गुरुदेव माध्य तथा उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन।
कार्तिक पटेल वणी – शिरपूर येथील श्री गिरुदेव माध्य तथा उच्च माध्यमिक विद्यालय येथे तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 23 जाने 2023 रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटक माजी आमदार वामनराव कासावार ,अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष टीकारामजी कोंगरे, प्रमुख पाहुणे डॉ गायत्री ताजने, प्रा अविनाश घरडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे, इझहार शेख, अविनाश ठावरी, पुरुषोत्तम कोंगरे, जगदीश बोरपे, सुवर्णा बॉंडे, ऍड विजय बोधे, उपस्थित राहणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम. दिनांक 24 जाने 2023 रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तर 25 जाने 2023 रोजी बक्षीस वितरण समारोह कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाणेदार गजानन करेवाड हे उपस्थित राहणार बक्षीस वितरक डॉ अभिनव कोहळे, प्रमुख पाहुणे पुरुषोत्तम कोंगरे, प्रेमनाथ वातीले, मुख्याध्यापक मोतीराम परचाके, की श उमाटे, उपस्थित राहणार आहे. उपस्थित विद्यार्थी ,कर्मचारी व निमंत्रित पाहुण्यांना स्नेहभोजनाचा आस्वाद घेता येईल. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी कल्याण मंडळ परिश्रम घेत आहे.