Thursday, October 3, 2024
Google search engine
HomeUncategorizedस्पर्धा परीक्षेसाठी  विद्यार्थ्यांना जिद्द चिकाटी व कठोर परिश्रमाची  गरज - आमदार संजीवरेड्डी...

स्पर्धा परीक्षेसाठी  विद्यार्थ्यांना जिद्द चिकाटी व कठोर परिश्रमाची  गरज – आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार  

स्पर्धा परीक्षेसाठी  विद्यार्थ्यांना जिद्द चिकाटी व कठोर परिश्रमाची  गरज – आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार  

कार्तिक पटेल वणी – स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी व कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागते असे प्रतिपादन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले . जागृत पत्रकार संघाद्वारे 1 जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास 400 विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 16 जानेवारी रोजी वसंत जिनिंग येथे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यातील 9 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष वणीचे आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार हे होते. तर उदघाटक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी एस आंबटकर हे होते. तर अतिथी म्हणून वणीचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे,  काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख, निर्भीड ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय खाडे, जेष्ठ पत्रकार माधव सरपटवार,वैभव ठाकरे,विदर्भ अध्यक्ष राजू धावंजेवार उपस्थित होते.  जेष्ठ पत्रकार माधव सरपटवार यांनी मार्गदर्शन केले. व पत्रकारितेचे महत्व, कार्य याबाबत पत्रकारांना मार्गदर्शन केले. पी एस आंबटकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना निरंतरता ठेवावी व हार न मानायची मानसिकता ठेवावी असे प्रतिपादन केले.माजी नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांनी  पत्रकार संघाद्वारे असे सामाजिक कार्यक्रम फार कमीच घेतल्या जातात असे प्रतिपादन करून जागृत पत्रकार संघाचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले.   जागृत पत्रकार संघाद्वारे घेण्यात स्पर्धा परीक्षेच्या निकालात मुलांमधून प्रथम क्रमांक तुषार कडुकर यानी पटकावला. 5 हजार रुपये व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक अविनाश डाहूले 3 हजार व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तृतीय परितोषिकांचे मानकरी प्रदीप काकडे हे ठरले. त्यांना 2 हजार रुपये व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर चतुर्थ क्रमांक मदन निब्रड व अभिजित येडे या दोघांना समान गुण मिळाल्याने त्यांना 1000 रुपये व  स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.    मुलींमध्ये प्रथम क्रमांक सुप्रिया रामटेके यांनी पटकाविला तिला 5 हजार रुपये व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक कल्याणी निखाडे हिला 3 हजार रुपये व स्मृतीचिन्ह देण्यात आले. तृतीय क्रमांक भांदेकर हिला 2 हजार रुपये व स्मृतीचिन्ह देण्यात आले. तर चतुर्थ पुरस्काराचे मानकरी स्नेहा जेंगठे ठरली तिला 1000 रुपये व स्मृतीचिन्ह देण्यात आले.   कार्यक्रमात जागृत पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप बेसरकर, सचिव मोहमद मुस्ताक, उपाध्यक्ष विवेक तोटेवार, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम नवघरे, सहसचिव प्रशांत चंदनखेडे, सदस्य गणेश रंगणकर, प्रवीण नैताम, श्रीकांत कितकुले, मनोज नवले, आकाश दुबे, राहुल आहुजा व कायदेविषयक सल्लागार ऍड अमोल टोंगे उपस्थित होते.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments