मा श्री वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त म्यांराथान दौड।
सुरेन्द्र इखारे वणी – वणी विधानसभा क्षेत्राचे भारतीय काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त म्यांराथान दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी वणी येथील लोकमान्य टिळक चौकातून म्याराथान दौड स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती. या म्यारथान दौड स्पर्धेमध्ये पुरुष व महिला असे दोन गट होते प्रत्येक गटाला चार क्रमांक देण्यात आले यामध्ये प्रथम पुरस्कार 4 हजार रुपये, द्वितीय 3 हजर ,तृतीय 2 हजार तर चतुर्थ 1 हजार रुपये अशी बक्षिसांची लय लूट करण्यात आली. या म्यांराथान दौड स्पर्धेला वणी येथील मान्यवर शेख अफसर भाई व डॉ महेंद्र लोढा यांनी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात केली व उपस्थित मान्यवरांचे हस्ते स्पर्धेत येणाऱ्या स्पर्धक निकिता निकोडे, सुप्रिया रामटेके, चित्र टेकाम, मानसी काळे, जाजिया अन्सारी, अंजली ,राशी तर पुरुष गटात प्रवीण नारनवरे, विरु गावडे, अमित धोबे, ओम गारघाटे, आकाश ठमके, या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी प्रमुख मान्यवर शेख अफसर भाई यांनी बक्षीसे दिली . यावेळी डॉ महेंद्र लोढा, डॉ मोरेश्वर पावडे, जिल्हा अध्यक्ष वंदना आवारी , शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर,आशिष कुलसंगे, प्रा दिलीप मालेकार, प्रा शंकर वरहाटे, राजाभाऊ पाथरडकर, संजय खाडे, रवी देठे, डॅनी सँडरवार,, पुरुषोत्तम आवारी, वामन कुचनकर,प्रमोद लोणारे,तेजु बोढे, महादेव दोडके,दीनेश पाऊनकर, वंदना आवारी, नीलिमा काळे, वंदना दगडी, संध्या बोबडे, मंद बांगरे, सविता ठेपाले, मंगला झिलपे, संगीता खाडे यांची उपस्थिती होती.