स्व. विठ्ठल पाटील मांडवकर विद्यालयात
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
प्रशांत जुमनाके वणी – स्व. विठ्ठल पाटील मांडवकर विद्यालय तेजापूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रेया मालेकार हिने केले तर प्रास्ताविक अर्जुन तिरणकर याने केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे सहायक शिक्षक श्री. मदन मडावी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक श्री. शेषराव बेलेकार, प्रकाश गारघाटे, मारोती पिंपळकर, नयन नंदूरकर, गजानन मालेकार व विजय मांडवकर होते. यावेळी दीक्षा झाडे, सुजल थेरे, तुषार राऊत, समीक्षा गिरसावळे यांनी नेताजींच्या जीवनावर प्रकाश टाकला. आपल्या अध्यक्षीय भाषणातून मदन मडावी यांनी विद्यार्थ्यांना जाणीवजागृतीची आठवण करून दिली व आपल्या ध्येयपूर्ती साठी आपण अभ्यासाकडे लक्ष द्यावे व प्रत्येक गोष्टीचे गांभीर्य ठेवावे असा मोलाचा संदेश दिला. आभारप्रदर्शन कु. तन्हवी शिरपूरकर हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. संतोष मालेकार, प्रवीण विधाते व संजय तामगाडगे यांनी परिश्रम घेतले.