25.7 C
New York
Wednesday, July 17, 2024

बाबासाहेब आंबेडकर हे तत्वज्ञान आहे -डाॅ.यशवंत मनोहर

बाबासाहेब आंबेडकर हे तत्वज्ञान आहे -डाॅ.यशवंत मनोहर

जयंत साठे प्रतिनिधी नागपूर –   : अंबाझरी येथील वीस एकर जमिनीवर असलेले व संबंधित विकासकाने उध्वस्त केलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन त्याच जागेवर उभारण्यात यावे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची जागा ज्या करारान्वये खाजगी कंपनीस दिली आहे, तो करार रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी महिलांनी आयोजित केलेल्या धरणे आंदोलनाला प्रा.डाॅ. यशवंत मनोहर यांनी भेट दिली.
याप्रसंगी बोलताना मनोहर म्हणाले की, बाबासाहेबांची गगनभेदी प्रतिमा उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. बाबासाहेबांना विरोध म्हणजे वैश्विक तत्वज्ञानाचा विरोध होय. संपूर्ण जगाची रचना कशी असावी, संपूर्ण जगाचे एकच संविधान कसे असावे याचा उल्लेख पाकिस्तानची फाळणी या ग्रंथात नमूद आहे.बाबासाहेब हे बावनकशी सोनं आहे.त्याची आपल्याला देखभाल करावी लागेल.हे तत्वज्ञान आहे,त्याच्याशी आपल्याला नातं जोडावे लागेल.बावीस प्रतिज्ञा पुस्तकांत नसून वर्तनात असते असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.डाॅ.सरोज आगलावे, प्रास्ताविक किशोर गजभिये,तर आभार प्रा.डाॅ.धनराज डहाट यांनी मानले.यावळी आंबेडकर विचारधारा चे विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News