पेटूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा।
सुरेंद्र इखारे वणी – तालुक्यातील पेटूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहन शाळा समीतीचे अध्यक्ष श्री अमोलजी ठावरी यांचे हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी ,डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजण करण्यात आले. प्रजासत्ताक दिना निमित्त गावातून शालेय विद्यार्थ्यांनी आकर्षित वेशभूषा परिधान करून पंढरपुर रैली काढून संपूर्ण गावकऱ्यांचे लक्षवेधले कार्यक्रमाला उपस्थित शालेय व्यवस्थापण समितीचे सभापती अमोल ठावरी , सरपंच प्रवीण झाडे, उपसरपंच गजानन ढेंगळे, कृषी सहायक कायदे व मुख्याध्यापक विजय पिपराडे व श्री वसंत येरमे अध्यपक सौ गिता मडावी स अ सौ प्रतिभा निमकर कु वंदना येडमे अध्यापिका उपस्थित होत्या . प्रजासत्ताक दिनी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शो ड्रिल सादर केले त्यामुळे उपस्थित असलेल्या सर्व नागरिक गावकऱ्यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळेत सर्व अध्यापक व अध्यापिका यांनी परिश्रम घेतले.