लो.टिळक महाविद्यालयाच्या अनसूया बोबडेचे सुयश।
कार्तिक पटेल वणी – येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या पदव्युत्तर विभागाची विद्यार्थिनी अनसूया मनोहर बोबडे हिने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या २०२२ मध्ये झालेल्या विज्ञान पारंगत विषयाच्या विद्यापीठ परीक्षेमध्ये ९.४२ श्रेयांकासह गुणवत्ता यादी चतुर्थ स्थान प्राप्त करीत घवघवीत यश संपादन केले आहे.
रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ सुनंदा आस्वले यांच्यासह विभागातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नाने महाविद्यालयास रसायनशास्त्र विभागात हे यश प्रथमच प्राप्त झाले आहे हे विशेष उल्लेखनीय.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांच्यासह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ करमसिंग राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयात या यशाबद्दल अनुसूया बोबडे हिचा सन्मान करण्यात येऊन सर्व मान्यवरांनी तिच्या उज्वल भवितव्यासाठी तिला शुभकामना प्रदान केल्या.