तालुकास्तरीय नृत्यस्पर्धेत विद्यानिकेतनचे सुयश।
कार्तिक पटेल वणी – मारेगाव तालुक्यात प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर तहसिल प्रशासनाद्वारे आयोजित तालुकास्तरीय नृत्यस्पर्धेत विद्यानिकेटन इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या नृत्य कलाकारांनी यश संपादन केले. ही स्पर्धा पाच गटात घेण्यात आली होती त्यामध्ये पूर्वप्राथमिक गटात विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला तसेच प्राथमिक गटात तृतीय क्रमांक ,उच्चप्रथमिक गटात द्वितीय क्रमांक ,माध्यमिक गटात द्वितीय तर उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक पटकावून मारेगाव शहरातील तमाम प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले . विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा संध्या पोटे, राजेश पोटे, व मुख्याध्यापिका ज्योत्स्ना बॉंडे यांनी कौतुक व अभिनंदन केले.