19 C
New York
Saturday, May 18, 2024

मनोविश्वाला समृद्ध करणाऱ्या खऱ्या साहित्याची निवड करावी   – डॉ.अभिजित अणे

मनोविश्वाला समृद्ध करणाऱ्या खऱ्या साहित्याची निवड करावी   – डॉ.अभिजित अणे

सुरेंद्र इखारे वणी    – ” सामाजिक माध्यमांच्या अमर्याद विस्तार काळात विविध प्रकारचे साहित्य वाचकांच्या समोर सतत कोसळत असताना चित्त चलित आणि विचलित करणाऱ्या पर्यायांना बाजूला ठेवत आपल्या मनोविश्वाला समृद्ध करणाऱ्या खऱ्या साहित्याची निवड करण्याची गरज आहे तरच   वाचकांचा विवेक  वृद्धिंगत होईल व त्यांचा गोंधळ उडणार नाही  .” असे विचार लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे अध्यापक तथा विदर्भ साहित्य संघ वणी चे सचिव डॉ अभिजित अणे यांनी व्यक्त केले.
वर्धा येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील ” वाचन पर्यायांच्या पसाऱ्यात गोंधळलेले वाचक ” या परिसंवादात ते बोलत होते. मनोहर म्हैसाळकर सभागृहात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद संपन्न झाला.
लेखनाच्या प्रकाशन पर्यायांचा इतिहास सांगून, आज लहान लहान संदेश वाचण्याची आणि स्वतःची नवी तांत्रिक भाषा उपयोगात आणणाऱ्या नवीन पिढीचा उल्लेख करीत, आपल्यासमोर अनेक पर्याय असले तरी निवडण्याचा आपला अधिकार अबाधित आहे हे सांगत आपल्या विविध अंगी विकास करणाऱ्या साहित्यालाच निवडण्याच्या विवेकाची सद्यकाळात अधिक असणारी अत्यावश्यकता अधोरेखित केली.
या परिसंवादात सोशल मीडियात कार्यरत पशुवैद्यकतज्ञ पुष्कर कुलकर्णी यांनी कृत्रिम तांत्रिक बुद्धिमत्तेमुळे समोर वाढवून ठेवलेल्या आवाहनाला अधोरेखित केले. ठाणे जिल्हा ग्रंथालय कार्यवाह चांगदेव काळे विदर्भात साहित्यिकांची मोठी मांदियाळी असून ती या व्यासपीठावर दिसत नाही ही खंत व्यक्त केली. मराठीचे प्राध्यापक डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी नव्या माध्यमातून आपण लेखन करायला हवे यावर भर दिला.
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. मीनाक्षी पाटील यांनी नवपर्यायांनी गोंधळून न जाता आपल्याला वाचकाभिमुख होऊन, त्यांना आवडेल त्या माध्यमातून लेखन करावे लागेल असे विचार व्यक्त केले.
परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा. मनीषा रिठे यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश वानखेडे यांनी केले.
परिसंवादाच्या श्रोत्यांमध्ये महाविद्यालयीन तरुणांचा प्रतिसाद वैशिष्ट्यपूर्ण होता.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News