वणीत धम्म मेळाव्याचे आयोजन...
बाबासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन लाभणार….
प्रशांत जुमनाके वणी प्रतिनिधी: -रमाई प्रज्ञासुर्याची सावली म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साठी संथ तेवत्या दिप ज्योती प्रमाने जळणारी अशी रमाई…वाचाल जे जे काही तुमच्या नयनात येईल पाणी.. अशा त्यागमुर्ती रमाई आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्य भारतीय बौध्द महासभा वणी तालुका व यवतमाळ जिल्हा पुर्वच्या वतीने दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ सोमवारला सकाळी ११ वाजता शासकिय मैदान वणी येथे धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दोनही नातु वंचीत बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मा. ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि भरतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भिमराव आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. जगदीश गवई, (भारतीय बौध्द महासभा व बौध्दांची जबाबदारी) एम. डी. सरोदे गुरुजी सचिव मुंबई भारतीय बौध्द महासभा, (रमाई आंबेडकर यांची संघर्ष गाथा ) रेखाताई ठाकुर प्रदेश अध्यक्ष वंचीत बहुजन आघाडी, अशोक सोनवणे प्रदेश अध्यक्ष, भारीप, कुशल मेश्राम सदस्य पार्लमेंट्री बोर्ड वंचित बहुजन आघाडी, प्रा. डॉ. किसन चव्हाण उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश वंचित बहुजन आघाडी, रवि भगत जिल्हाध्यक्ष यवतमाळ पश्चिम भरतीय बौध्द महासभा, धर्मपाल माने, रमेश गजभे, माजी राज्यमंत्री, गोविंद दळवी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, वंचीत बहुजन आघाडी, शरद वसतकर, पक्ष निरीक्षक यवतमाळ जिल्हा पूर्व, भगवान इंगळे अध्यक्ष यवतमाळ पूर्व भारतीय बौध्द महासभा, डॉ. निरज वाघमारे, इत्यादी मार्गदर्शन करणार आहे. तेव्हा समस्त आंबेडकरी व बहुजन जनतेनी ह्या भव्य धम्म मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आव्हान भारतीय बौध्द महासभा वणी तालुक्याचे वतीने करण्यात येत आहे.