महाकालपूर येथील जेष्ठ नागरिक महादेवराव घुगुल यांचे 105 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन।
सुरेन्द्र इखारे वणी – तालुक्यातील कायर परिसरातील महाकालपूर येथील जेष्ठ नागरिक महादेवराव तुकाराम घुगुल यांचे वृद्धपकाळाने वयाच्या 105 व्या वर्षी निधन झाले आहे. कायर येथील बूट हाऊसचे विक्रेते रवी घुगुल यांचे आजोबा महाकालपुर येथील स्वातंत्र्य पूर्व काळातील वयोवृद्ध नागरिक महादेवराव तुकाराम घुगुल यांचे आज दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोज दुपारी 2.30 वाजता वृद्धपकाळाने वयाच्या 105 व्या वर्षी निधन झाले त्यांचे पाठीमागे तीन मुले एक मुलगी नातसुना नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे . आज सायंकाळी 6.00 वाजता महाकालपुर येथील स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील आप्तसकीय मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.