राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत लायन्सची गरुडझेप
सुरेंद्र इखारे वणी – शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे अमरावती विभागस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज च्या 14 वर्षाखालील मुली व 17 वर्षाखालील मुली या दोनही संघाने अंतिम सामने जिंकून राज्यस्तरीय विभागासाठी पात्र ठरले आहेत. मेहकर क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या टेनिस क्रिकेय स्पर्धेत लायन्स संघाने अमरावतीच्या संघाला पराजित करून विजय मिळवला. यामध्ये 14 वर्षांखालील स्वरा करंडे, स्वरा धोपटे, श्रावणी काळे, श्रेया मोहूर्ले, भविका हेपट, संस्कृती केळकर, सुजाता काळे, तनुष्का पिसे, मुस्कान जैन, गायत्री कटारिया, अनोखी केमेकर, त्रिशा कोडगुर्ले, तसेच 17 वर्षाखालील त्रिपती निषाद, मृणाल चौधरी , अनघा एकरे, आकांशा निकुंबे, श्रुष्ठी खाडे, लक्ष्मी नक्षीने, सुहानी काळे, रिया लोखंडे, श्रद्धा आस्कर, प्रियंका संघर्ष पुसाटे, भूमिका बदखल, सावंगी काकडे, लायन्स इंग्लिश मिडीयम स्कुलची चमू राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करणार असून त्यांच्या यशाबद्दल विजयी खेळाडूंचे व क्रीडा प्रशिक्षकांचे वणी येथे आगमन होताच लायन्स संस्थेमार्फत तसेच शिक्षकवृंद व पालकाद्वारे भव्य स्वागत करण्यात आले आहे. संघाच्या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व खेळाडू व क्रीडा प्रशिक्षक अविनाश उईके यांचे संस्थेचे अध्यक्ष शमीम अहेमद ,उपाध्यक्ष डॉ के आर लाल, सचिव महेंद्र श्रीवास्तव, कोशाध्यक्ष रमेश बोहरा, डॉ आर दि देशपांडे, सुधीर दामले, सी के जॉबनपुत्रा, बलदेव खुंगर राजाभाऊ पाठरडकर, मंजिरी दामले, प्राचार्य प्रशांत गोडे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.