25.6 C
New York
Monday, June 24, 2024

वणीच्या बोडी तलावाच्या सौंदर्यीकरनाचे काम अपूर्णच

 वणीच्या बोडी तलावाच्या सौंदर्यीकरनाचे काम अपूर्णच   

  नगर पालिका प्रशासकाला लक्ष देण्याची गरज     

सुरेंद्र इखारे वणी –  शहरात ब्रिटिश काळापासून असलेल्या मोमीनपूरलगत व रामपुरा वार्डा लागत असलेल्या बोडी तलावाच्या  खोलीकरनाच्या कामासोबत सौंदर्यीकरण करण्याच्या कामाला 2019 मध्ये सुरुवात झाली होती . आज जवळपास चार वर्षे लोटून सुध्दा अजून पर्यंत बोडी तलावाच्या सौंदर्यीकरनाचे काम अपूर्णावस्थेतच आहे.     तेव्हा वणी शहरातील बोडी तलावाच्या सौंदर्यीकरनाचे काम पूर्ण होऊन नागरिकांना सौंदर्यीकरनाचा लाभ मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. 15 मे 2019 मध्ये बोडी तलावाच्या खोलीकरनाच्या कामाला सुरुवात झाली होती. या बोडी तलावाचे खोलीकरण साडे सहा फूट खोल तर तीन लाख 75 हजार चौरसफुट रुंद व सात कोटी 5 लाख 32 हजार चौरसफुट लांबीच्या कामाला सुरुवात झाली होती. आज संपुर्ण तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा आहे. व सभोवताल पारिवर सिमेंटच्या रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु सिमेंटच्या रस्त्याला भेगा जात असल्यामुळे हा सिमेंटचा ट्रॅक टिकणार की नाही असा प्रश्न शहरातील नागरिकांत निर्माण झाला आहे.  तलावाच्या सौंदर्यीकरनाच्या कामात थातुरमातुर पणा दिसून येत असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे. अजून पर्यंत तलावाच्या सौंदर्यीकर्णाचे काम पूर्ण झाले नाही आज नगर पालिकेवर प्रशासक असल्याने हे काम धीमी गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा प्रशासकाने जातीने लक्ष घालून तलावाच्या सौंदर्यीकर्णाचे काम त्वरित पूर्ण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तलावाच्या मध्यभागी बुरुज करून त्या बुरुजावर वृक्ष लागवड करण्यात आली होती परंतु मोकाट जनावरांनी संपूर्ण बुरुजवरील वृक्ष नष्ट करून टाकल्याने बुरु बोडखे झाले आहे तेव्हा या तलावाच्या संरक्षणासाठी नगर पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. आज या तलावाच्या खोलीकरणावर करोड रुपये खर्च झाला असून अजून पर्यंत  तलावाच्या  सौंदर्यीकरनाचे काम पूर्ण झाले नाही  तेव्हा नगर पालिका प्रशासनाने व प्रशासकाने तलावाच्या सौंदर्यीकर्णाचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी नागरिकाकडून केली जात आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News