Wednesday, October 9, 2024
Google search engine
HomeUncategorizedवणीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त  भव्य स्पर्धा परीक्षा 

वणीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त  भव्य स्पर्धा परीक्षा 

वणीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त  भव्य स्पर्धा परीक्षा 

कार्तिक पटेल वणी –    शहरी व  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि त्यांना प्रवाहात आणून त्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळावे यासाठी वणीतील रॉयल फाउंडेशन तसेच शिवचरण प्रतिष्ठान यांच्या आयोजनातून आयकॅन करिअर अकॅडमी, कृष्णा मास्टर्स अकॅडमी,उड्डाण फिजिकल करिअर अकॅडमी यांच्या सहकार्यातून भव्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
आज पार पडलेल्या या स्पर्धा परीक्षेचे आयोजन नूरजहाँ बेगम सलाम अहमद महाविद्यालय वणी येथे करण्यात आले होते.या स्पर्धा परीक्षेत  वणी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता .
विद्यार्थी परीक्षार्थींचे मनोबल वाढविण्याकरिता वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. प्रदीपजी शिरसकर साहेब आणि नूरजहाँ बेगम सलाम अहमद महाविद्यालयाच्या सचिव डॉ.राणानूर सिद्धिकी यांनी भेट दिली.
या स्पर्धा परीक्षेकरिता    मा.श्री ऍड.निलेशजी चौधरी, प्राचार्य डॉ. रोहित वनकर यांचे मार्गदर्शन लाभले.
आयकॅन करिअर अकॅडमी चे सोपान लाड सर, कृष्णा मास्टर्स अकॅडमीचे निलेश निवलकर सर आणि उडान फिजिकल करिअर अकॅडमी चे गणेश आसुटकर सर यांचे सहकार्य लाभले. तसेच
स्पर्धा परीक्षा करिता शिवचरण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल झट्टे, सचिव ललित कचवे, उपाध्यक्ष निखिल तुराणकर, तुषार बल्की, संतोष लाभशेट्टीवार, योगेश आवारी, हितेश गोडे, गौरव दोडके, साहिल पारखी,पवन बुऱ्हान, राजू चौधरी, सचिन भेंडाळे, दुष्यंत वासेकर, नीरज धावंजेवार, अभिजीत येरणे, अमित गायकवाड, पवन उरकुंडे, चेतन कवरासे, राजुभाऊ गव्हाणे, प्रज्वल चौधरी, स्वप्निल हिवरकर यांनी परिश्रम घेतले.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments