25.6 C
New York
Monday, June 24, 2024

अभिज्ञान शाकुंतलम् अभ्यासक्रमाला प्राप्त होत आहे अपूर्व प्रतिसाद

अभिज्ञान शाकुंतलम् अभ्यासक्रमाला प्राप्त होत आहे अपूर्व प्रतिसाद

सुरेन्द्र इखारे वणी     –     शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणीचे संस्कृत विभाग प्रमुख तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संस्कृत अभ्यासक्रम मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी, कविकुलगुरू कालिदासांच्या विश्वविख्यात अभिज्ञान शाकुंतलम् नाटकावर तयार केलेल्या अभ्यासक्रमाला संस्कृतचे विद्यार्थी आणि संस्कृत प्रेमी नागरिकांचा अपूर्व प्रतिसाद प्राप्त होत आहे. १६ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू झालेल्या या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच व्हिडिओचा आत्तापर्यंत ३००० श्रोत्यांनी आस्वाद घेतला आहे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण.
डॉ. स्वानंद पुंड यांनी यापूर्वी अशाच स्वरूपात नीतिशतकम् आणि मेघदूतम् या विषयांवर देखील असेच अभ्यासक्रम तयार केले असून त्यांचा देखील हजारो संस्कृत प्रेमींनी लाभ घेतला आहे हे विशेष उल्लेखनीय.
भारत शासनाच्या स्वयम् ,मूक इत्यादी प्रणालीनुसार मराठी भाषेत सोप्या पद्धतीने तयार केलेले अभ्यासक्रम आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपणच विकसित करावे या लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांच्या संकल्पनेतून आणि सहकार्यातून हे अभ्यासक्रम साकार होत आहेत.
आयुष्यात संस्कृत साहित्याचा आनंद घ्यायचा होता पण विविध कारणांनी तो शक्य झाला नाही अशी खंत असणाऱ्या प्रत्येक संस्कृत आणि संस्कृती प्रेमी साठी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आणि पूर्णतः नि:शुल्क स्वरूपातील हे अभ्यासक्रम म्हणजे अपूर्व संधी असल्याने अक्षरशः जपान पासून अमेरिकेपर्यंत अनेक देशातून ३०० पेक्षा अधिक तर एकूण ६००० पेक्षा अधिक संस्कृत प्रेमी या उपक्रमात सहभागी झाले असून ही संख्या रोज वाढत आहे.
डॉक्टर, इंजिनिअर ,सीए, वकील, प्रशासकीय अधिकारी, प्रवचनकार, कीर्तनकार इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवर या उपक्रमांचा लाभ घेत आहेत हे विशेष उल्लेखनीय.
आपल्यापैकी ज्या संस्कृत प्रेमींना या नि:शुल्क अभ्यासक्रमांचा लाभ घ्यायचा असेल. त्यांनी 9822644611 या व्हाट्सअप क्रमांकावर आपले नाव आणि अपेक्षित अभ्यासक्रमाचे नाव पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News