फळेगाव येथील स्व माणिकराव पांडे विद्यालयाचे शेतक-यांसाठी बहुद्देशिय हैड मॉडेल या प्रतिकृतीची इंन्स्पायर अवॉर्ड राज्यस्तरावर
सुरेंद्र इखारे वणी – बाभुळगाव तालुक्यातील स्व. माणिकराव पांडे (पाटील) माध्य विद्यालय फाळेगाव शाळेतील बालवैज्ञानिक कु समीक्षा एकनाथ मसराम ही ची इंस्पायर अवॉर्ड राज्यस्तर निवड झाल्याबद्दल 50वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन यवतमाळ. येथे जिल्हाचे कर्तव्यदक्ष अधिकारी मा श्री अमोल येडगे साहेब. जिल्हाधिकारी यवतमाळ,मा. डॉ. श्री. श्रीकृष्ण पांचाळ साहेब मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प यवतमाळ मा. डॉ. जयश्री राऊत शिक्षणाधिकारी यवतमाळ यांच्या हस्ते कु· समीक्षा मसराम हीला प्रशस्तीपत्र व गिफ्ट देऊन सन्मानित केले आहे.
कु. समिक्षा मसराम हीने आज झालेला माझा सन्मान माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण राहील असे सांगितले यांचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक अविनाश रोकडे मार्गदर्शक विज्ञान शिक्षक राजेंद्र राऊत व इतर कर्मचारी वृंदाना दिले मनपुर्वक कौतुक व अभिनंदन करण्यात आले आहे.