वणी शहरात ढोलताशांच्या गजरात शिवजयंती साजरी
सुरेंद्र इखारे वणी – शहरातील शिवजन्मोत्सव युवा मित्रा मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तरुण मावळ्यांनी शिवजयंती उत्सवहाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पूजा करून व पुष्पहार घालून हातात पताका घेऊन ढोलताशांच्या गजरात युवा मावळ्यांनी भव्य शोभायात्रा काढली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी, तरुण युवकांचा समावेश होता या रॅलीत घोड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत तरुण व, मा जिजाऊ, बाल संभाजी च्या वेशभूषेत तसेच,छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी त्यासमोर भजन मंडळ , तसेच मुला मुलींच्या ढोल ताशांचे आकर्षण होते , नृसिंह व्यायाम शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी लाठी काठीचे चौका चौकात प्रात्यक्षित सादर करत होते , ट्रॅक्टरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा व छत्रपती शिवाजी महाराजांचे नारे देत व डीजे वाद्याच्या तालावर तरुणाईचा जल्लोष करत रॅली पुढे जात होती या शोभायात्रे मध्ये खासदार बाळूभाऊ धानोरकर, डॉ महेंद्र लोढा, संजय खाडे, तेजराज बोढे, प्रा शंकर वरहाटे, नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोद इंगोले , माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे , मनसेचे कार्यकर्ते व सर्वांचा या शोभायात्रेत तसेच शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळाचे सदस्यगण व मोठया प्रमाणात तरुणाईचा समावेश होता. या शोभायात्रेतील छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी संजयभाऊ व किरणताई देरकर व युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांनी सुध्दा पकडली. या रॅलीत मोठया प्रमाणात शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळातील युवा मावळ्यांचा समावेश होता. रयतेचा राजा, बहुजनांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, लोककल्याणकारी अशी कितीही विषशने लावली तरी कमी पडतील .असे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रॅलीला पाहण्यासाठी चौक चौकात उत्सुक असणाऱ्यांनी अभिवादन करून नतमस्तक होत होती.या शोभयात्रेसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुध्दा शहरवासीयांनी केली होती. या शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळाच्या तरुणांनी पुढाकार घेऊन शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.