Wednesday, September 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedवेळाबाई येथे शिवजयंती उत्साहात साजरी   

वेळाबाई येथे शिवजयंती उत्साहात साजरी   

वेळाबाई येथे शिवजयंती उत्साहात साजरी             

सुरेंद्र इखारे वणी –      तालुक्यातील वेळाबाई ग्रामपंचायत प्रांगणात  जगदंब प्रतिष्ठान व एकता क्रिकेट क्लब  यांचेवतीने शिवजयंतीचा कार्यक्रम उत्सवहात साजरा   करण्यात आला आहे.          कार्याक्रमचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ.रंजनाताई शंकर बांदुरकर   प्रमुख पाहुणे  श्री.रमेशजी डाहुले पोलीस ,  श्री संदीप मेश्राम उपसरपंच ,श्री संतोष सांबरे सर,  श्री हनुमंत येसेकर मा पोलीस पाटील, डॉ.श्रद्धा सं.पेंदाने, श्री मानकर सर , श्री नाग्भिडकर सर , श्री.विलासजी नरांजे, श्री.शिवशंकरजी नांदे, श्री.गजाननजी खोले, पुरुषोत्तमजी वाढनकर, श्री.शंकरजी बांदुरकर, श्री.राहुल उलमाले श्री.शामरावजी मोहितकर हे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून सकाळी ८.३० वाजता दिंडी काढण्यात आली  त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तसेच चिमुकल्यानी सुद्धा आपले विचार व्यक्त केले . या ठिकाणी  ग्रामवासीयांकरिता आरोग्य शिबिराचे आयोजन केले यामध्ये डॉ. श्रद्धा पेंदाने, डॉ.अमोल चौधरी, सौ.लिना सुखदेवे, सौ.रेनुताई उमरे, सौ.कल्पना खारकर व इतरांनी सेवा दिली. त्यानंतर रात्री. ८.३० वाजता शिवशाहीर राजेशजी सोयाम यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला व  सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यावेळ गावकऱ्यांनी  उस्फुर्त असा प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन येसेकर यांनी केले तर आभार  श्री किशोर शंकावार यांनी मानले .कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतचे कर्मचारी व जगदंबा प्रतिष्ठान , एकता क्रिकेट क्लबच्या मुलांनी सहकार्य केले .

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments