चलो वणी … विदर्भ निर्माण यात्रेत सहभागी व्हा !
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आवाहन
नागपूर येथे 5 मार्च ला विदर्भ राज्य आंदोलन समितीचा समारोप
सुरेंद्र इखारे वणी – वणी ,मारेगाव व झरी तालुक्याच्या कोअर कमिटीच्या बैठकीत विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे दिनांक 21 फेब्रुवारी 2023 ते 5 मार्च 2023 पर्यंत पूर्व विदर्भातून एक कालेश्वर सिरोंचा ते नागपूर व पश्चिम विदर्भातील जिजाऊ माहेर घर सिंदखेडराजा ते नागपूर अशी दुसरी विदर्भ निर्माण यात्रा निघत आहेत तेव्हा वणी उपविभागातील नागरिकांनी “विदर्भ निर्माण यात्रेत” सहभागी होण्यासाठी चलो वणी असे आवाहन कोअर कमिटीने केले आहे या दोन्ही यात्रांचा समारोप दिनांक 5 मार्च 2023 ला नागपूर येथील संविधान चौकात होणार आहे. पूर्वेकडील विदर्भ निर्माण यात्रा गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यांना भेटी देत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, गडचांदूर, जिवती कोरपना मार्गे ही यात्रा आपल्या शहरात दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोज शुक्रावरला आपल्या वणी शहरात सायंकाळी 6.00 वाजता पोहचत आहे. या यात्रेचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज चौकात वणी येथे करण्यात येणार आहे. व त्या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे स्वागत करण्यासाठी शहरातील मान्यवर नेते डॉ भालचंद्र जी चोपणे, प्रदीपभाऊ बोनगीरवार,जयसिंग गोहोकार, इजहार भाई , राजाभाऊ पाठरडकर, किरणताई देरकर,वंदना आवारी, संध्या बोबडे, कॉ अनिल घाटे, मंगल तेलंग, अजय धोबे, विजय नगराळे, प्रा दिलीप मालेकर, अनिकेत चामाटे , व इतरही मान्यवर उपस्थित राहणार आहे. विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी बेरोजगारांच्या रोजगारासाठी ,शेतमालाला योग्यभाव मिळण्यासाठी ,शेतकरी आत्महत्या, रोखण्यासाठी, सिंचन आणि इतरही क्षेत्रासाठी अनुशेष पूर्ण करण्यासाठी विदर्भाचे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होणे काळाची गरज आहे. तेव्हा विदर्भप्रेमी जनतेनी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनेउपस्थित राहण्याचे आवाहन प्रा पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, राहुल खारकर, प्रा बाळासाहेब राजूरकर, नामदेवराव जेणेकर, राजू पिंपळकर, संजय चिंचोळकर, अमित उपाध्ये, विजयालक्ष्मी अगबट्टलवार, शालिनीताई रासेकर, कलावती क्षीरसागर, अलका मोवाडे, सुषमा मोडक, दशरथ बोबडे, होमदेव जुमनाके, रेखा बोबडे, राहुल झत्ते, सृजन गौरकर, धीरज भोयर, पुंडलिक पथाडे, व्ही बी टोंगे, उलमाले सर, यांचे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केली.