निःस्वार्थ 24 तास मध्ये 88 रक्तदात्यांनी केले रक्तदान
सुरेन्द्र इखारे वणी – निःस्वार्थ सेवा 24 तास रक्तदान सामाजिक ग्रुप वणी यांच्यावतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने ” भव्य रक्तदान शिबिरात” 88 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ऍड कुणाल चोरडिया हे होते.प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, ठाणेदार प्रदीप शिरस्कर, वाहतूक निरीक्षक संजय आत्राम, निमकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेशॉपचार रुग्णालय नागपूर व रक्तगट तपासणी तसेच डॉ अनिता सरदेशपांडे यांनी शिवजयंती च्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिरात आपल्या चमूसह उपस्थित होते. यावेळी वणीकरांनी रक्तदान शिबिराला सहकार्य करीत 88 रक्तदात्यांनी रक्तदान केले याप्रसंगी डॉ अनिता सरदेशपांडे सहायक प्राध्यापक, रक्तपेटी तंत्रज्ञ सुजल डाहार, अधिपरिचरिका शालिनी थुल, रागिणी सुरकर, परिचर राजू उप्पलवार, दिनेश पन्नासे, दहीकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुर्यवनशी सर यांनी केले तर आभार अमोल धानोरकर यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी राज चौधरी , अमोल चौधरी ,राजकुमार सिंग, तसेच शिवचरण प्रतिष्ठान, शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळ, संभाजी ब्रिगेड, गुढीपाडवा उत्सव मंडळ, स्माईल फाउंडेशन व सर्व शिवभक्त व रक्तदाते यांनी सहकार्य केले