वणीचे भूमिपुत्र प्रा डॉ प्रदीप इंगोले यांची शैक्षणिक सल्लागारपदी नियुक्ती
सुरेंद्र इखारे वणी – यवतमाळ जिल्ह्यातील वणीचे भूमिपुत्र डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील माजी विस्तार शिक्षण संचालक तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरीचे कार्यकारी परिषद सदस्य प्रा डॉ प्रदीप गुलाबराव इंगोले यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ , नाशिक अंतर्गत विभागीय केंद्र ,नागपूर येथील वरिष्ठ शैक्षणिक सल्लागारपदी नियुक्ती झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे कुलगुरू डॉ प्रशांत पाटील यांच्या मान्यतेने प्रा डॉ प्रदीप गुलाबराव इंगोले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे . यात नागपूर विभाग अंतर्गत येणाऱ्या सहा जिल्ह्यातील एकंदरीत 224 केंद्राचे संचालन केले जात असून त्यातील तीन केंद्रावर कृषिचे अभ्यासक्रम राबविण्यात येते त्यामुळे या संपूर्ण अभयसक्रमाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांची शैक्षणिक अभ्यासक्रमावर सल्लागारपदी नियुक्ती झाली आहे विशेष म्हणजे ते वणी येथील नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोदभाऊ इंगोले यांचे धाकटे बंधू आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहे.