नागपूर येथे गाडगेबाबा जयंती साजरी
नागपूर जयंत साठे: महान कर्मयोगी,राष्ट्रसंत, प्रबोधनकार गाडगेबाबा यांची 147 वी जयंती बहुजन समाज पार्टीच्या वतीने मेडिकल चौक शेजारी असलेल्या गाडगे बाबा धर्मशाळेतील गाडगे बाबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश बसपा चे महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, पृथ्वीराज शेंडे, राजीव भांगे, नितीन शिंगाडे, विजयकुमार डहाट, मा प्रदेश सचिव उत्तम शेवडे, उत्तर प्रदेशातील माजी सांस्कृतिक मंत्री यशवंत निकोसे, जिल्हा प्रभारी नरेश वासनिक, राहुल सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, शहर प्रभारी विकास नारायणे, शहर उपाध्यक्ष सुमंत गणवीर, महिला नेत्या सुरेखाताई डोंगरे, वर्षाताई वाघमारे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत माल्यार्पण करण्यात आले. माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार बोरकर, विलास सोमकुवर, माजी मनपा पक्षनेते गौतम पाटील, माजी नगरसेवक मंगला लांजेवार, अजय डांगे, प्रवीण पाटील, सनी मून, योगेश लांजेवार, सदानंद जामगडे, ऍड अतुल पाटील, चंद्रशेखर कांबळे, शंकर थुल, प्रकाश फुले, नितीन वंजारी, बुद्धम राऊत, भानुदासजी ढोरे, सुनील सोनटक्के, एन आर उके, विलास मून, राकेश शेंडे, शामराव तिरपुडे, अरुण साखरकर, अनिल मेश्राम, आदि प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.