आम्रपाली फाउंडेशन तर्फे बालकलाकारांचा सत्कार
जयंत साठे नागपूर प्रतिनिधी -: आम्रपाली फाउंडेशन नागपूर तर्फे “रंग वेगळा लाॅकडाऊन” या नाटकात काम करणाऱ्या बाल कलावंतांचा सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रेम कुमार उके, तर प्रमुख अतिथी म्हणून वणी 24 न्यूजचे उपसंपादक जयंत साठे, वर्षा टेंभेकर, व गौतम मघाडे उपस्थित होते.
बालकलाकार, कनक काटकर,सिध्दी मलकवाडे, श्रेयस डोंगरे,नीत हिरेखन,कलश ढवळे,प्रत्युष बारमाटे, तनुश्री डोंगरे,ओम क्षिरसागर,निकिता बोंदाडे या बालकरांनी यांनी “रंग वेगळा लाॅकडाऊन ” या नाटकात उत्कृष्ठ भूमिका वठविल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुरज रोडगे,आभार कल्याणी डोंगरे यांनी केले.