वणीत दोन दिवसीय निःशुल्क पत्रकारिता कार्यशाळा
कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन
सुरेंद्र इखारे वणी – व्हाईस ऑफ डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने वणी येथील वसंत जिनिंग सभागृहात दिनांक 25 व 26 फेब्रुवारी 2023 रोजी दोन दिवसीय निःशुल्क पत्रकारिता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळ्याचे उदघाटक वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे ,तर अध्यक्षस्थानी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, प्रमुख अतिथी शिक्षण मंडळाचे संचालक पी एस आंबटकर, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, रंगनाथ स्वामी अर्बन चे अध्यक्ष संजय खाडे, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते दीपक रंगारी व ऍड कल्याणकुमार नागपूर हे “मराठी भाषा व्याकरण आणि प्रसार माध्यमे व डिजिटल मीडिया आणि कायदा या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशीच्या कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्याचे उडघाटक राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, तर अध्यक्षस्थानी तरुण भारतचे संपादक शैलेश पांडे, प्रमुख वक्ते संपादक लोकसत्ताक देवेंद्र गावंडे प्रमुख अतिथी खासदार बाळूभाऊ धानोरकर, माजी गृहमंत्री हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया, वसंत जिनिंग अध्यक्ष आशिष खुलसंगे हे उपस्थित राहणार आहे . तेव्हा या निःशुल्क पत्रकारिता प्रशिक्षण कार्यशाळेला विशेषतः 18 वर्षावरील व्यक्तीस पत्रकारिता या विषयी आवड असणाऱ्या व्यक्तीला सुध्दा उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन व्हाईस ऑफ डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेने केले आहे