19 C
New York
Saturday, May 18, 2024

वणी विवेकानंद विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप 

वणी विवेकानंद विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

सुरेंद्र इखारे वणी  : –       येथील विवेकानंद विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या  दहावीच्या विद्यार्थ्यांना  दिनांक 24 फेब्रुवारी 2023  रोजी निरोप देण्यात आला .        कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  श्री. रामकृष्ण विवेकानंद मंडळाचे सन्माननीय सचिव  अविनाश भाऊ ठावरी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक  दिलीप आसकर ,  पर्यवेक्षिका सौ. वंदनाताई वऱ्हाटे मॅडम, विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक गंगाधर गेडाम  ,  नवनाथ नगराळे  व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. वंदनाताई वऱ्हाटे मॅडम यांनी केले. तर निरोप समारंभ प्रसंगी दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना  शालेय जीवनातील आठवणीना उजाळा देत शाळेतील सर्व शिक्षकांनी परीक्षेच्या संदर्भामध्ये उत्तम मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल  विद्यालयातील सर्व शिक्षकांचे आभार मानले.   तसेच व्यासपीठावरील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत बोर्डाची परीक्षा देत असताना काय काय काळजी घेतली पाहिजे तसेच अभ्यास कसा करायचा याविषयी सुद्धा मार्गदर्शन केले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप आस्कर यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देत असताना ते म्हणाले  दहावीची ही बोर्डाची पहिलीच परीक्षा असल्यामुळे उत्तर पत्रिका कशी सोडवायची याबाबतचे मोलाचे मार्गदर्शन  केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लखामपुरे यांनी केले तर आभार तिखट यांनी मानले  .त्यानंतर दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व  विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  सहकार्य केले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News