19 C
New York
Saturday, May 18, 2024

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगण्यासाठी –  पत्रकार सागर मुने। 

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगण्यासाठी –  पत्रकार सागर मुने। 

सुरेंद्र इखारे वणी – माझं गाव माझा वक्ता या मालिकेच्या 18 व्या सत्रात ” थोरल राज सांगून गेलं” या विषयावर विचार व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लिहिण्याचे,ऐकण्याचे व पाहण्याचे नसून जगण्यासाठी आहे असे मत पत्रकार सागर मुने यांनी व्यक्त केले .   पुढे ते म्हणाले  ” माता पितांबद्दल परम श्रद्धा आणि त्यांच्या स्वप्नानुसार वागणे,शत्रूंना देखील विश्वास वाटावा असे अद्वितीय चरित्र आणि सर्वसामान्य प्रजाजनांमध्ये स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतवत अठरा पगड जातीचे मर्द मावळे तयार करणे. स्वराज्य आणि स्वदेश याबाबतीत प्राण समर्पित करणे इतकी निष्ठा जागृत करणे. या सर्वच गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी जणू काही भगवान राजा रामचंद्र यांच्या चरित्राचे अनुकरण करीत प्राप्त केल्या, त्यामुळेच शिवछत्रपतींचे राज्य रामराज्य प्रमाणे आदर्श राज्य ठरले. माता पिता आणि संस्कृती बद्दलचा आदर, चारित्र्य आणि राष्ट्रनिष्ठा हाच शिवप्रभूंची शिकवण आहे. महाराजांना स्वराज्य मिळवताना राष्ट्र निर्मितीसाठी अनेक कौटुंबिक, आप्तस्वकीय यांचा विचार न करता, स्वराज्यसाठी मरणारे व मारणारे निष्ठेचे मावळे निर्माण केले. प्रसंगी भावना म्यान केल्याशिवाय स्वराज्य मिळत नाही. असं थोरलं राज सांगून गेलं हे सत्य आहे.         विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्यात आयोजित होत असलेल्या माझं गाव माझा वक्ता या वैशिष्ट्यपूर्ण मालिकेच्या अठराव्या सत्रात ” थोरलं राजं सांगून गेलं !”
या विषया प्रसंगी व्यासपीठावर नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार तथा विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ.दिलीप अलोणे हे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक करत असताना  माधव सरपटवार यांनी आज प्रथमच व्याख्याता म्हणून उपस्थित होत असलेल्या युवा पत्रकाराचे स्वागत करीत हाच या उपक्रमाचा उद्देश आहे हे अधोरेखित केले.
आपल्या शांत,संयमी आणि अभ्यासपूर्ण भाषणात सागर मुने यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग मांडत त्यातून महाराजांनी आजच्या काळात आपल्याला दिलेला बोध उलगडून दाखविला. रामचरित्रासोबत शिवचरित्राचा असलेला सहसंबंध हा त्यांच्या विवेचनाचा विशेष आकर्षण बिंदू ठरला.तसेच
अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ दिलीप अलोने म्हणाले छत्रपती शिवराय हा डोक्यावर घेण्याचा विषय नसून डोक्यात साठवण्याचा विषय आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघाचे कार्यक्रम प्रमुख राजाभाऊ पाथ्रडकर यांनी केले  तर आभार  सचिव डॉ अभिजित अणे यांनी मानले .तसेच कार्यक्रमाची सांगता  जुमडे मॅडम यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने  झाली. या  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम मेंगावार, प्रमोद लोणारे, देवेंद्र भाजीपाले यांनी विशेष परिश्रम घेतले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News