विदर्भाचा सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र विदर्भाचे राज्य निर्माण होणे काळाची गरज
विदर्भ निर्माण यात्रेचे वणी शहरात उत्साहात स्वागत
सुरेंद्र इखारे वणी- विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने 21 फेब्रु ते 5 मार्च 2023 पर्यँत पूर्व विदर्भातून कालेश्वर सिरोंचा गडचिरोली ते नागपूर व पश्चिम विदर्भातून सिंदखेडराजा जिजाऊ माहेरघर बुलढाणा ते नागपूर या दोन्ही यात्राचा समारोप 5 मार्च 2023 ला नागपूर येथील संविधान चौकात होणार आहे पूर्वेकडील विदर्भ निर्माण यात्रेचे नेतृत्व पूर्व विभाग अध्यक्ष अरुण केदार, युवा अध्यक्ष मुकेश मसुरकर,सुधाताई पावडे,ज्योती खांडेकर,अशोक पाटील,तात्यासाहेब मत्ते,सुदाम राठोड,नरेश निमजे,आदी करीत आहे ही यात्रा गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनजागरण करीत बल्लारशह,राजुरा गडचांदूर,जिवती,कोरपना मार्गे वणी तालुक्यात 24 फेब्रुवारी रात्री 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचली या वेळी वाणीकरांच्या वतीने यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले प्रा.पुरुषोत्तम पाटील,डॉ भालचंद्र चोपणे,प्रदीप बोनगीरवार,जयसिंग गोहोकर,राजाभाऊ पाथरडकर,वंदनाताई आवारी,संध्या बोबडे,मंगल तेलंग,प्रा दिलीप मालेकर,अनिकेत चामाटे,राहुल खारकर,राजू पिंपळकर,देवराव धांडे,विजयाताई अगरबत्तलवार,सुरेखा वडीचार,अलका मोवाडे,सह समितीच्या कार्यकर्त्यांनी केले. त्यांनतर त्याच ठिकाणी प्रा पुरुषोत्तम पाटील यवतमाळ जिल्हा अध्यक्ष याचे अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेण्यात आली सभेत अरुण केदार,मुकेश मसुरकर,डॉ भालचंद्र चोपणे,राजाभाऊ पाथरडकर,वंदनाताई आवारी,मंगल तेलंग रफिक रंगरेज,यांनी संबोधित केले वक्त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की विदर्भातील बेरोजगराला रोजगार प्राप्ती साठी शेतमालाला योग्य दर मिळवण्यासाठी शेतकरी आत्महत्या,सिंचन व इतर क्षेत्रातील अनुशेष कुपोषण प्रदूषण संपविण्यासाठी तथा विदर्भाचा सर्वांगिण विकाससाठी स्वतंत्र विदर्भाचे राज्य निर्माण होणे काळाची गरज आहे विदर्भाचे वेगळे राज्य निर्माण होईपर्यंत आम्ही समिती सोबत असू असे अभिवचन वक्त्यांनी दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा बाळासाहेब राजूरकर,देवराव धांडे,नामदेव जेणेकर,संजय चिंचोळकर,दशरथ बोबडे,होमदेव कनाके,देवा बोबडे,अमित उपाध्ये,विजयाताई आगबत्तलवार,सुरेखा वाडीचार,कलावती क्षीरसागर,अलका मोवाडे,सुषमा पाटील,बेबीताई पिंपलशेंडे,संदीप गोहोकर,राकेश वराटे,पुंडलिक पथाडे,धीरज भोयर,मुक्तानंद भोंगळे,राहुल झट्टे,मंगेश रासेकर,याचे सह समितिच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले सभेचे संचालन प्रदीप बोरकुटे,प्रास्ताविक राजू पिंपळकर,तर आभार प्रदर्शन राहुल खारकर यांनी केले.