Thursday, October 3, 2024
Google search engine
HomeUncategorized" आम्ही एकलव्य म्हणून निघालो आणि एका टप्प्यावर आमचा अभिमन्यू झाला" -...

” आम्ही एकलव्य म्हणून निघालो आणि एका टप्प्यावर आमचा अभिमन्यू झाला” – शैलेश पांडे

” आम्ही एकलव्य म्हणून निघालो आणि एका टप्प्यावर आमचा अभिमन्यू झाला” – शैलेश पांडे

सुरेन्द्र इखारे वणी – येथील व्हाईस ऑफ डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत असताना डिजीटल तरुण भारतचे संपादक शैलेश पांडे म्हणाले, पत्रकारिता क्षेत्रात 32-33 वर्षे झाली आमची उमेदीची वर्षे आम्ही या व्यवसायाला दिली. 90 च्या मागेपुढे ” आम्ही एकलव्य म्हणून निघालो आणि एका टप्प्यावर आमचा अभिमन्यू झाला” आणि नंतर असं ठरवलं की, या व्यवसायात आपल्याला पैसे अडका काही मिळत नाही. परंतु या क्षेत्रात आपली आटी रमली आहे. आतातरी नाव तरी कमवू या, समाजासाठी काहीतरी करू या अशी भावना घेऊन काम करत राहिलो. हे करत असताना खंत वाटत नाही . तेव्हा पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिकता जोपासणे महत्वाचे आहे, तरच पत्रकारितेचे काम करत असताना खंत वाटणार नाही असे मत या प्रसंगी व्यक्त केले. येथील व्हाईस ऑफ डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेने वसंत जिनिंग सभागृहात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. आज दिनांक 26 फेब्रुवारी2023 रोजी दुसऱ्या दिवसाचा उद्घाटन सोहळा थाटात साजरा झाला. या उद्घाटन सोहळ्याचे उदघाटक वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे , अध्यक्ष डिजीटल तरुण भारताचे संपादक शैलेश पांडे, प्रमुख वक्ता लोकसत्ताचे संपादक देवेंद्र गावंडे, प्रमुख अतिथी तहसीलदार निखिल धुळधर, सौ तृप्ती उंबरकर, माजी जी. प. सदस्य अलका टेकाम, अलका बोदडकर, काँग्रेस यवतमाळ जिल्हा महिला अध्यक्षा वंदना आवारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी व्हाईस ऑफ डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे उद्घाटन रिबन कापून करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत कु. निशा थोरात हिने भीम गीताने केले. उपस्थित मान्यवरांचे हस्ते लक्ष्मी रमेश आक्केवार यांचा मरणोत्तर सन्मान साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला, चक्रवर्ती तिर्थगिरीवार याना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले, मेहरुमा शेख यांच्या कुटुंबियासहित मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तुळशीराम महाजन यांच्या मरणोत्तर त्यांच्या पत्नी यांचा सत्कार करण्यात आला ,रमेश पाटील यांच्या मरणोत्तर पुरस्काराने त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. तसेच हरिप्रसाद पांडे याना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा प्रसंग त्यांच्याच मुलावर आल्याने एक भावनिक वातावरण निर्माण झाले होते . अशा या प्रसंगी वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे , सौ तृप्ती उंबरकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे वक्ते लोकसत्ताचे संपादक देवेंद्र गावंडे यांनी पत्रकारांना आपल्या वाणीतून सभ्यभाषेत मोलाचे मार्गदर्शन केले. पुढे शैलेश पांडे म्हणाले, जे नवोदित पत्रकार आहे व मी जो एकलव्याचा उल्लेख केला ना ते भविष्यात अभिमन्यू होणार तेव्हा अभिमन्यू होऊ नये यासाठी आहे. आशिष खुलसंगे यांनी पत्रकारांना सुधारण्याचा मोलाचा सल्ला दिला. तेव्हा त्यांनी दिलेल्या मौलिक विचारांनी पत्रकारिता करावी असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार राजू निमसटकर यांनी केले तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी व्हाईस ऑफ डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments