-1.4 C
New York
Friday, March 1, 2024

संजय जीवने यांचा आंबेडकर सांस्कृतिक जलसा संपन्न

संजय जीवने यांचा आंबेडकर सांस्कृतिक जलसा संपन्न

जयंत साठे नागपूर प्रतिनिधी :-       आंबेडकर सांस्कृतिक भवन, अंबाझरी परिसर बचाव कृती समितीच्या वतीने आज अंबाझरी परिसरातील शामियानात महिला लक्षवेधी धरणे कार्यक्रमाचा 38 वा दिवस जनतेच्या अफाट गर्दीत संपन्न झाला. सकाळी अकरा वाजता पासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कार्यक्रमांची रेलचेल होती. प्रबोधन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य केले जाते. संजय जीवने प्रस्तुत आंबेडकर सांस्कृतिक जलसा हे आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. या जलसात संजय जीवने यांनी आंबेडकर भवनाच्या प्रश्नावर गीतांची रचना करून त्याचे सादरीकरण केले. त्यांना सांची जीवने आणि वंदना जीवने यांनी साथ दिली. संगीताची साथ सम्यक अलोणे, कुणाल सावरकर, योगेश क्षीरसागर यांनी दिली.डाॅ. धनराज डहाट यांनी आंबेडकर सांस्कृतिक जलसाचे चळवळीतील महत्त्व प्रतिपादित केले. आजच्या 38 व्या दिवशीही महिला पुरुषांचा आवेश अधिक वाढताना दिसत होता. पुढच्या आंदोलनाची तयारी प्रत्येकाच्या वक्तव्यातून व्यक्त होत होती. आंबेडकर भवनाची 20 एकर जागा मिळालीच पाहिजे आणि आंबेडकर भवन पाडणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्याची डॉ. सरोज आगलावे, तक्षशिला वाघदरे, सुषमा कळमकर, सुधीर वासे, पुष्पा बौद्ध, राजेश गजघाटे, राहुल परुळकर, अब्दुल गफूर पाशा, जनार्दन मून उषा बौद्ध आणि इतर प्रयत्नशील होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News