विदर्भ निर्माण यात्रेच्या समारोपाला वणी उपविभागातील शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार.
सुरेंद्र इखारे वणी :— विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने 21 फेब्रु ते 5 मार्च 2023 पर्यँत पूर्व विदर्भातून कालेश्वर सिरोंचा गडचिरोली ते नागपूर व पश्चिम विदर्भातून सिंदखेडराजा जिजाऊ माहेरघर बुलढाणा ते नागपूर या दोन्ही यात्रा निघालेल्या असुन त्या नागपुरच्या दिशेने आगेकूच करीत आहेत. विदर्भातील ११ जिल्हे व ७० पेक्षा ज्यास्त तालुके आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये सभा व भेटीच्या माध्यमातून विदर्भ निर्माणा बाबत जनजागरण होत आहे. या यात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत होत असुन लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
विदर्भातील विविध समस्या जसे शेतकरी आत्महत्या, शेतमालाला योग्य भाव न मिळणे, बेरोजगारी, सिंचन,व इतर क्षेत्रातील अनुशेष, कुपोषण,प्रदुर्षण,व इतरही समस्येचे एकमेव उत्तर म्हणजे विदर्भाचे स्वतंत्र राज्य ! विदर्भचे स्वतंत्र राज्य निर्माणा शिवाय या समस्येची सोडवणूक नाही.
म्हणुनच स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीची गरज करीत या दोन्ही यात्रेचा समारोप 5 मार्च 2023 ला नागपूर येथील संविधान चौकात होणार आहे.पुढील तिव्र आंदोलनाची दिशा याच ठिकाणी जाहीर होणार आहे. वणी,मारेगाव,झरी तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्यातील हजारो विदर्भ प्रेमी जनतेनी व कार्यकर्त्यांनी या समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन यवतमाळ जिल्हा प्रमुख प्रा.पुरुषोत्तम पाटील, उपाध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर, रफिक रंगरेज,युवक सचिव राहुल खारकर, देवराव धांडे, तालुका अध्यक्ष नामदेव जेणेकर, जिल्हा संघटक राजु पिंपळकर,शहर अध्यक्ष संजय चिंचोळकर,दशरथ बोबडे,होमदेव कनाके,देवा बोबडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष विजयाताई आगबत्तलवार, सुरेखा वडीचार, कलावती शिरसागर, अलका मोवाडे, धीरज भोयर, पुंडलिक पथाडे, मुक्तानंद भोंगळे, संदीप गोहोकार, राहुल झट्टे, यांनी केले आहे.