यंदाही वणीची शान असलेल्या गुद्दलपेंडीचा खेळ रद्द होण्याची शक्यता *
मात्र धुलीवंदनाच्या दिवशी महामुर्ख कवी संम्मेलनाची मेजवानी
सुरेंद्र इखारे वणी- गेल्या दोन तीन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटामुळे वणीची आगळीवेगळी शान असलेली गुद्दलपेंडी चा खेळ व कवी संम्मेलन शासनाच्या आदेशाने होऊ शकली नाही . यावर्षीही सुध्दा ऐतिहासिक गुद्दलपेंडी चा खेळ न होण्याची शक्यता बळावली आहे.मात्र वणीकरांसाठी धुलीवंदनाच्या दिवशी महामुर्ख कवी संम्मेलनाची मेजवानी आहे. विदर्भात वणी शहराची ओळख करून देणारा खेळ म्हणजे गुद्दलपेंडी या खेळाने वणी शहराला ओळख दिली आहे. या गुद्दलपेंडी खेळाला शंभर दीडशे वर्षाची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. हा खेळ खुल्या मैदानामध्ये दोन खांबांना एक जाड दोर म्हणजे नाडा बांधला जातो . या नाड्याच्या दोन्ही बाजूनी 10ते 15 मल्ल एका हाताने नाड्याला पकडून उभे राहातात आणि गुद्दलपेंडी सुरू होण्याचा इशारा होताच नाड्याच्या दोन्ही बाजूकडील मल्ल आपापल्यासमोर असणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला कमरेच्यावर ठोसा लगावणे सुरू करतात. हा प्रकार इतका भयंकर असतो की क्षणभर आपण हादरतो. पण तिथले दोन्ही प्रतिस्पर्धी मात्र एकमेकांवर ठोश्या ने प्रहार करतात या प्रकारात अनेक मल्लांच्या नाका-तोंडातून रक्त येऊन जखमी होतात या जखमीं मल्लांना पूर्वी काळ्या दगडाच्या मूर्तीच्या समोर टाकण्यात येत होते व शुद्धीवर आल्यावर काहीवेळाने पुन्हा उठून खेळायला लागायचे म्हणजेच या खेळामध्ये ठोसा मारून मनगटाच्या जोरावर हा खेळ खेळाला जातो या खेळाला गुद्दलपेंडी असे म्हणतात . हा खेळ वणी वासीयांकरिता वेगळा नसला तरी या खेळाने वणी शहराची ओळख संपूर्ण विदर्भात पोहचविले आहे. कारण प्रत्येक गावाचे काहींना काही वैशिष्ट्य असते या वैशिष्ट्यामुळे गावाला विशेष महत्व प्राप्त होते . तसे वणी शहर अनेक वैशिष्टयानी भरलेले शहर आहे.त्यामुळे गुद्दलपेंडी हा खेळ त्यातील एक भाग आहे. हा खेळ होळीच्या पर्वावर खेळला जाणारा खेळ आहे कारण असा खेळ भारतात कुठेच खेळला जात नाही असा दावा पूर्वी वणी वासीयांचा होता. होळी हा सण संपूर्ण भारत देशात सर्वत्र साजरा केला जातो. आणि विविध प्रकारांनी साजरा होतो व वणीत होळी या सणाचे दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी रात्रीला गुद्दलपेंडी व त्याच दिवशी दोन ठिकाणी महामुर्ख कवी संम्मेलनाचे आयोजन केले जाते . परंतु यावर्षी ऐतिहासिक गुद्दलपेंडी चा कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र महामुर्ख कवी संम्मेलनाचे आयोजन करण्यात आलेले दिसून येत आहे त्यामुळे वणीकरांसाठी कवी सम्मेलनाची मेजवानी आहे. परंतु वणी शहरामध्ये ऐतिहासिक गुद्दलपेंडी न होण्याची चर्चा दिसून येत आहे . गेल्या कित्येक वर्षांपासून वणीमध्ये गुद्दलपेंडी चा खेळ खेळल्या जात होता. आज शे दोनशे वर्षाची गुद्दलपेंडी ची ऐतिहासिक परंपरा व वणीची शान असलेली गुद्दलपेंडी चा खेळ होणार नाही अशी सर्वत्र चर्चा होत असल्याने ही ऐतिहासिक परंपरा मोडकळीस येईल असे बोलल्या जात आहे.