मारेगाव येथे अन्यायाविरुद्ध एक दिवसीय धरणे आंदोलन
विदर्भ पटवारी संघ व विदर्भ मंडळ अधिकारी संघाने दिले जिल्हाधिकारी अमोल येडगे याना निवेदन
सुरेन्द्र इखारे वणी :– अवैध गौण खनिज प्रकरणामध्ये अन्यायकारक झालेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी या मागणीचे निवेदन विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळ व विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा यवतमाळ शाखा मारेगाव यांनी दिले जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब याना निवेदन . दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी दिलेल्या नोटीस मधील नियोजित टप्प्यानुसार आज दिनांक 2 मार्च 2023 रोजी विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा वणी तहसील कार्यालय मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय मारेगाव समोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आली आहे. महागाव तालुक्यातील अवैध गौण खनिज प्रकरणामध्ये निलंबित झालेले एक मंडळ अधिकारी पी आर कांबळे, व तलाठी आय जी चव्हाण व दुसरे तलाठी डी बी चव्हाण यांचे निलंबन विनाशर्थ व विणाविलंब मागे घेण्यात यावे या मागणीसाठी मारेगाव तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व सर्व तलाठी यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले या आंदोलनामध्ये विदर्भ पटवारी संघटनेचे तसेच विदर्भ मंडळ अधिकारी संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते . या आंदोलनाचे संपूर्ण नेतृत्व मंडळ अधिकारी संघाचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ कांडरकार तसेच तलाठी संघटनेचे उपाध्यक्ष प्रफुल सोयम सहसचिव विकास मडावी यांनी केले.तसेच यवतमाळ जिल्ह्यात विविध ठिकाणी जसे मारेगाव व वणी येथे संघटनेच्या माध्यमातून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे.