वणीच्या श्री रंगनाथ स्वामी यात्रेतील मास विक्रीची दुकाने हटविण्याची मागणी
अजिंक्य शेंडे यांनी दिले मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
सुरेंद्र इखारे वणी :- श्री रंगनाथ स्वामी जत्रेच्या जागेवरील मास विक्रीचे दुकाने हटविण्याबाबतचे निवेदन युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी मुख्याधिकारी अभिजित वायकोस याना दिले. वणी शहराचे आराध्य दैवत असलेले श्री रंगनाथ स्वामी मंदिर या मंदिराच्या नावाने भरत असलेल्या यात्रेचे उदघाटन वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस व त्यांच्या पत्नी यांनी श्री रंगनाथ स्वामी मंदिराची पूजा करून यात्रेची सुरुवात केली आहे. ही यात्रा वणी शहरात 37 दिवसांची आहे . त्यामुळे यात्रेला येणाऱ्या व्यावसायिकांना तसेच इतर मनोरंजन करणाऱ्या विदूषक , आकाश पाळणे, मौतक कुवा, अशा विविध दुकानांना जत्रा मैदानावरील जागा देऊन दुकाने थाटण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यात्रेतील परिसर स्वच्छ व सुंदर राहण्याची व्यवस्था नगर पालिकेच्या आरोग्य विभागाची राहणार आहे तेव्हा येथील मास विक्रीचे दुकाने हटविण्यात यावी जेणेकरून श्री रंगनाथ स्वामी यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याकरिता नगर पालिका प्रशासनाने व प्रशासकाने अशा दुकानावर त्वरित कारवाई करून हटविण्यात यावी अशा मागणीचे निवेदन युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, मिलिंद बावणे, विशाल घटोडे, हर्ष येरने, अमृत फुलझेले, अभिजित सुरशे, पी पाटील, सिनू दासारी, राजू वाघमारे, चेतन उलमाले, परशुराम पोटे, आशु ठाकूर, अभिषेक मेश्राम, युवराज तुरणकर, आरिफ अली, गौरव तातकोंडावर, आदर्श गुरफुडे, यांनी दिले आहे.