Wednesday, October 9, 2024
Google search engine
HomeUncategorizedशेतकऱ्यांच्या मुलाला प्रधानमंत्री करा  - प्रा. ज्ञानेश वाकुडकर 

शेतकऱ्यांच्या मुलाला प्रधानमंत्री करा  – प्रा. ज्ञानेश वाकुडकर 

शेतकऱ्यांच्या मुलाला प्रधानमंत्री करा  – प्रा. ज्ञानेश वाकुडकर         

मा डॉ. भालचंद्र चोपणे सह नवनिर्वाचित आमदार श्री लिंगाडे, श्री अडबाले व श्री वंजारी यांचा जाहीर सत्कार संपन्न.         

सुरेन्द्र इखारे वणी-:      देशातील सद्याच्या राजकीय परिस्थिती बघता लोकशाही जिवंत राहील की नाही याबाबत साशंकता आहे. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत गंभीर आणि धोकादायक संकट आहे. आजच्या परिस्थितीबाबत विश्लेषण करत असताना शेतकऱ्यांचे उदाहरण देऊन तुमची प्रचंड मोठी विहीर आहे. शेतामध्ये प्रचंड पाणी आहे, तुमची इलेक्ट्रिकची लाईन विहिरीपर्यंत गेली असेल, तुम्ही मोटार सुद्धा फिट केली, असेल पण पंपाचं कनेक्शन केलं नसेल तर तुमची विहीर, पंप, पाणी बिनकामाचे आहे आणि त्यामुळे तुमचं शेत सुकल्याशिवाय राहणार नाही तसेच चळवळीच सुद्धा झालं आहे. आम्ही चळवळीच्या माध्यमातून आंदोलन खूप करतो ,ओबीसीच असं करू, तसं करू;पण मतदान करताना आमची बुद्धी मात्र विरोधकांनाच मतदान करते. तर मग तुमच्या या चळवळीला कवडीचीही किंमत राहत नाही असे मी समजतो. आपल्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी आपलं सरकार , शेतकऱ्याच सरकार, बहुजनांच सरकार असलं पाहिजे. त्यासाठी प्रधानमंत्रीपदी शेतकऱ्यांचा मुलगा असला पाहिजे. असे प्रतिपादन प्रा. ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष-लोकजागर अभियान,नागपूर हे *”जातनिहाय जनगणना आणि OBC(VJ, NT, SBC) आंदोलनाची भूमिका”* याविषयावर बोलताना केले. OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना वणी-झरी-मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जाहीर सत्कार सोहळ्यात दि. ०४ मार्चला त्यांनी मार्गदर्शन करताना वरील मत व्यक्त केले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले व जाहीर सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. केंद्राची किंवा राज्याची एकही योजना जी सर्वसामान्य लोकांसाठी बेरोजगारांसाठी,कर्मचाऱ्यांसाठी, भगीनींसाठी असेल ? अशी कुठलीही योजना नाही. असे प्रतिपादन उदघाटक खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले.सत्कारमूर्ती महाराष्ट्राचे भूषण डॉ.भालचंद्र चोपणे साहेब आणि विधानपरिषदेकरिता नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले सर, धिरज लिंगाडे, अभिजीत वंजारी यांचा जाहीर सत्कार मान्यवरांच्या हस्ते व OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना वणी-झरी-मारेगाव यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी आमदार अभिजीत वंजारी यांनी वणी विषयी जुन्या आठवणींना उजाळा दिला. डॉ.भालचंद्र चोपणे साहेब यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. डॉ.भालचंद्र चोपणे साहेब, आमदार सुधाकर अडबाले,आमदार धिरज लिंगाडे यांनी सत्काराबाबत आयोजकांचे आभार मानले. आम्ही जुन्या पेन्शनचे पुरस्कर्ते आहोत. जुनीच पेन्शन लागू करण्यासाठी सरकारकडे प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन केले. जाहीर सत्कार सोहळाचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप प्रमुख-विदर्भ राज्य आंदोलन समिती यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. स्वागताध्यक्ष संजय खाडे अध्यक्ष-रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड,वणी यांनी उपस्थितांचे स्वागत करून OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना वणी-झरी-मारेगाव यांच्या कार्याला सदिच्छा दिल्या. विचारपीठावर सत्कारमूर्ती डॉ. भालचंद्र चोपणे साहेब, आमदार सुधाकर अडबाले सर,आमदार धिरज लिंगाडे,आमदार अभिजीत वंजारी तसेच आमदार प्रतिभाताई धानोरकर, वरोरा-भद्रावती, मा. तात्यासाहेब मत्ते,सदस्य-विदर्भ राज्य आंदोलन समिती,जातनिहाय जनगणना कृती समितीचे अध्यक्ष-प्रदिप बोनगिरवार आणि OBC(VJ, NT, SBC) प्रवर्गातील समाज संघटनाचे प्रतिनिधी इत्यादी मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून मोहन हरडे सर यांनी जातनिहाय जनगणना व जुनी पेन्शन ही का आवश्यक आहे हे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप बोरकुटे सर व रघुनाथ कांडारकर सर यांनी तर सत्कारमूर्तीचा परिचय रवी चांदणे व नितीन मोवाडे तर चोपणे साहेबांचे सन्मानपत्र वाचन सोनाली जेनेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. राम मुडे यांनी मानले. या जाहीर सत्कार समारंभात मा वामनराव चटप साहेबानी वेगळा विदर्भ राज्य का महत्वाचा आहे? यावर विधान करून 31 डिसेंबर 2023 पर्यत वेगळा विदर्भ राज्य केल्याशिवाय शांत बसणार नाही असे ठामपणे सांगितले.या जाहीर सत्कार सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वणीकरांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments