महात्मा फुले विद्यापीठांतर्गत प्रशिक्षण
जयंत साठे नागपूर प्रतिनिधी: – यवतमाळ येथे महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ अंतर्गत १८ ते ३० वयोगटातील युवक – युवतींसाठी ,
पाच दिवसाचे प्रशिक्षण दि. २० ते २३ मार्च २०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे.
आतापर्यंत ५ बॅचेस मधून गडचिरोली जिल्हा ओबीसी समाज संघटनेच्या वतीने ३१ युवक व १३ युवती यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. प्रशिक्षण स्थळी प्रशिक्षण, निवास व भोजन व्यवस्था संपूर्ण निशुल्क असून प्रशिक्षणार्थी ला यवतमाळ पर्यंतचा जाण्यायेण्याचा प्रवास खर्च स्वतः करायचा आहे.
आयुष्यात अगदी वेळेवर अशा प्रकारचे प्रशिक्षण मिळणे खूपच लाभदायक आहे. आईवडिलांकडून,परिचितांकडून व आतापर्यंतच्या क्रमिक शिक्षणातून अशाप्रकारचे जीवन शिक्षण मिळाले नव्हते. अशा प्रतिक्रिया प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या युवक-युवतींच्या आहे.सध्यातरी हे प्रशिक्षण ओबीसी, एन टी वर्गातील प्रशिक्षणार्थींसाठी आहे.
तेव्हा सर्व पालकांनी आपल्या पाल्याच्या भविष्यकालीन व्यक्तिमत्वाचा विचार करून, पाल्यास आवर्जून प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे करावे.
ओबीसी. एनटी .विजे.समाज संघटनेच्या प्रत्येक सन्माननीय व्यक्तींनी यासाठी तनमनधनाने आवर्जून व मनापासून प्रयत्न करून युवक- युवतींना हे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करावे.
प्रशिक्षणास जाताना स्वत:चे एक पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड व टी सी ची झेरॉक्स घेऊन जावे. अशी विनंती विनित- जिल्हा ओबीसी जनमोर्चा, भारतीय पिछडा (ओबीसी )शोषित संघटन संघटनेद्वारा केली आहे.