25.7 C
New York
Wednesday, July 17, 2024

क्रांतीज्योती सावित्रीमाईला अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीमाईला अभिवादन

जयंत साठे नागपूर प्रतिनिधी:      भारतातील प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 126 व्या स्मृतिदिना निमित्त नागपूर जिल्हा व शहर बसपाच्या वतीने महात्मा फुले मार्केट परिसरातील क्रांती ज्योतीच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
अभिवादन महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे व रंजनाताई ढोरे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, उत्तर प्रदेशचे मा मंत्री यशवंत निकोसे, मा प्रदेश सचिव उत्तम शेवडे, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, महिला प्रभारी सुरेखाताई डोंगरे व वर्षाताई वाघमारे, शहर प्रभारी विकास नारायणे आदि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी बसपा नेत्यांनी फुले दांपत्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करणे व पुण्याच्या भिडे वाड्यातील प्रथम मुलींच्या शाळेला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करणे आदी मागण्या शासनाला करण्यात आल्या.
याप्रसंगी प्रामुख्याने माजी मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, माजी सभापती वैशाली चांदेकर, माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, उत्तर नागपूरचे अध्यक्ष जगदीश गजभिये, पश्चिमचे अध्यक्ष सनी मून, मध्यचे अध्यक्ष प्रवीण पाटील, दक्षिणचे नितीन वंजारी, पूर्वचे मुकेश मेश्राम, दक्षिण पश्चिमचे सदानंद जामगडे, जितेंद्र पाटील, वीरेंद्र कापसे, शंकर थुल, परेश जामगडे, मॅक्स बोधी, सुनील डोंगरे, सैफअली पठाण, अभय डोंगरे, विलास मून, अनिल मेश्राम, तपेश पाटील, अंकित थुल, संभाजी लोखंडे, विलास पाटील, रोशन बनसोड, ज्योतिबा अलोणे, मनोज रंगारी, राजरतन कांबळे, प्रकाश फुले, विलास पाटील, राहुल उके, बाळू वांद्रे, हसीन गजभिये, सतीश साठे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News